रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप

मिलिंद संगई
मंगळवार, 22 मे 2018

रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने आज वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले. दिवसभर उन्हात व धुळीत उभे राहून वाहतूक पोलिस आपले कर्तव्य पार पाडत असतात, त्यांना धुळीचा त्रास होऊ नये या उद्देशाने रोटरी क्लबचे अध्यक्ष अब्बास नासिकवाला यांच्या पुढाकारातून आज पोलिसांना मास्कचे वाटप केले गेले.

बारामती(पुणे) - रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने आज वाहतूक पोलिसांना मास्कचे वाटप करण्यात आले. दिवसभर उन्हात व धुळीत उभे राहून वाहतूक पोलिस आपले कर्तव्य पार पाडत असतात, त्यांना धुळीचा त्रास होऊ नये या उद्देशाने रोटरी क्लबचे अध्यक्ष अब्बास नासिकवाला यांच्या पुढाकारातून आज पोलिसांना मास्कचे वाटप केले गेले.

रोटरीचे सचिव सचिन गुप्ता, खजिनदार अली असगर बारामतीवाला, उपप्रांतपाल स्वप्निल मुथा यांच्यासह कौशल सराफ, महावीर वडूजकर, निखिल मुथा या प्रसंगी उपस्थित होते. पोलिस निरिक्षक मानसिंग खोचे यांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल रोटरी क्लबच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले.

 

Web Title: Mask distribution to the traffic police on behalf of Rotary Club of Baramati