‘मस्केटिअर’चा निर्माता

- शाऊल अविदोव, संस्थापक आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी, मस्केटिअर 
मंगळवार, 10 जानेवारी 2017

शाऊल यांच्या घराजवळ असलेल्या नाइट क्‍लबच्या परिसरात दोन तरुणींवर हल्ला करण्यात आला. त्या तरुणींनी मदतीसाठी केलेला आरडाओरडा कोणी ऐकला असता किंवा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रसंग इतरांच्या लक्षात आला असता, तर निश्‍चितच कोणीतरी त्यांच्या मदतीला धावले असते आणि अनर्थ टाळला असता, असे शाऊल यांना वाटले. या घटनेनेच त्यांना २०१२ मध्ये मस्केटिअर स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. गेली २३ वर्षे ते आयडीएफबरोबर काम करत आहेत. मस्केटिअरचे संपूर्ण कामकाज त्यांनी एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवले आहे. अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्यास सदैव तत्पर असणाऱ्यांचा संच मस्केटिअरने उभा केला आहे.

शाऊल यांच्या घराजवळ असलेल्या नाइट क्‍लबच्या परिसरात दोन तरुणींवर हल्ला करण्यात आला. त्या तरुणींनी मदतीसाठी केलेला आरडाओरडा कोणी ऐकला असता किंवा त्यांच्यावर हल्ल्याचा प्रसंग इतरांच्या लक्षात आला असता, तर निश्‍चितच कोणीतरी त्यांच्या मदतीला धावले असते आणि अनर्थ टाळला असता, असे शाऊल यांना वाटले. या घटनेनेच त्यांना २०१२ मध्ये मस्केटिअर स्थापन करण्याची प्रेरणा मिळाली. गेली २३ वर्षे ते आयडीएफबरोबर काम करत आहेत. मस्केटिअरचे संपूर्ण कामकाज त्यांनी एका वेगळ्या उंचीला नेऊन ठेवले आहे. अडचणीत सापडलेल्यांना मदत करण्यास सदैव तत्पर असणाऱ्यांचा संच मस्केटिअरने उभा केला आहे. मस्केटिअरने व्यक्तिगत सुरक्षेत त्यांनी मोठे परिवर्तन घडवून आणले आहे. स्मार्ट शहरे, उद्योग आणि समाजाचाला एकत्र आणून सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे मस्केटिअर ॲपचे तत्त्व आहे.

डिजिटल आर्टिस्ट

- याल गेवर,  प्रोग्रॅमर आणि थ्री डी शिल्प कलाकार 

डिजिटल आर्टिस्ट असलेल्या गेवर यांच्या पाठीशी थ्री डी तंत्रज्ञानातील १८ वर्षांचा अनुभव आहे. कला प्रांतातील त्यांचा व्यापक अनुभव आणि तंत्रज्ञानाचे असलेले ज्ञान यांच्या संगमातून त्यांनी कॉम्प्युटर सिम्युलेशनमध्ये कार्य करून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपला कलाविष्कार साकार केला आहे. मल्टिमीडिया डिझाईन आणि तंत्रज्ञानातील कल्पक योगदानाबद्दल त्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानीत केले आहे. झापा डिजिटल आर्टस्‌ आणि गिझमो यासारख्या कंपन्यांचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आहेत. जानेवारी २०१० मध्ये गिझमो आणि डॅझ थ्री डी यांचे विलीनीकरण झाल्यानंतर डॅझ थ्री डीचे ते सहसंस्थापक झाले. इंटरनेट मल्टिमीडिया टेक्‍नॉलॉजी, थ्री डी कॉम्प्युटर ग्राफिक्‍स ॲनिमेशन तंत्रज्ञान, व्हिजन टेक्‍नॉलॉजी आणि डाटा ट्रान्समिशन अशा बाबींमधील आठ पेटंट गेवर यांच्या नावावर आहेत.

Web Title: masketear producer

टॅग्स