कौतुकास्पद ! दशक्रिया विधीचा खर्च टाळून पोलिसांना मास्क, सॅनेटाइझर

डी. के. वळसे पाटील
रविवार, 28 जून 2020

  • माजी सैनिक बबनराव पडवळ यांचा दशक्रिया विधीचा खर्च टाळून पोलिसांना मास्क, सॅनेटाइझर व स्मशान भूमी परिसर विकासासाठी देणगी

मंचर (पुणे) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडील माजी सैनिक बबनराव श्रीपती पडवळ (वय-80) यांचा दशक्रिया विधी साध्या पद्धतीने केला. दशक्रियेचा खर्च टाळून मंचर पोलीस ठाण्याला 25 हजार रूपये किमतीचे मास्क व सॅनेटाइझर चे वाटप केले. तसेच महाळुंगे पडवळ येथील समशान भूमी परिसर विकासासाठी 51 हजार रुपयांची देणगी दिली. त्यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते हेमंत पडवळ व उद्योजक सुदाम पडवळ यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

भारताच्या सीमेवर योद्धा म्हणून  (स्व.) बबन राव पडवळ यांनी काम केले. सेवानिवृत्तीनंतर हि त्यांनी लष्करात तरुणांनी भरती व्हावे म्हणून जनजागृतीचे काम केले. महाळुंगे पडवळ गावातील सामाजिक व धार्मिक, शैक्षणिक कार्यात त्यांचा सहभाग होता. दिलेल्या देणगीतून स्मशान भूमी परिसरात वृक्ष लागवड व अन्य विकास कामे करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
--------------
प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
--------------
कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूंची संख्या...
--------------
स्मृती प्रीत्यर्थ हेमंत पडवळ व सुदाम पडवळ यांनी कोरोना आजार रोखण्यासाठी रात्र दिवस काम करणाऱ्या पोलीसांना दिलेल्या मदतीचा स्वीकार पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलिस निरीक्षक सागर खबाले यांनी केला. यावेळी पोलीस नाईक विनोद गायकवाड, नवनाथ नाईकरे, सोमनाथ वाफगावकर यांनी केला. विशेष म्हणजे सदर साहित्य वाटप करताना कोणीही उपस्थित न राहण्याचा निर्णय पडवळ कुटुंबाने घेतला होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणीही हजर नसल्याने आंबेगाव तालुक्यातील पत्रकारांच्या हस्ते साहित्याचे वाटप झाले. सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल खराडे व सचिन तोडकर यांनी पडवळ कुटुंबाचे आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Masks sanitizers to the police avoiding the cost of the Dashakriya Vidhi

टॅग्स
टॉपिकस