‘एमटेक एव्हिएशन’कडे पाठ

‘एमटेक एव्हिएशन’कडे पाठ

पुणे - कुशल वैमानिक घडविण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मास्टर्स ऑफ टेक्‍नॉलॉजी इन एव्हिएशन (एमटेक) अभ्यासक्रम सहा वर्षांपूर्वी सुरू झाला; परंतु या अभ्यासक्रमाचे विमान अवकाशात उंच झेपावू शकत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या संख्येवरून दिसत आहे; परंतु गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर असल्यामुळे सुरवातीला जाणीवपूर्वक मोजक्‍याच विद्यार्थ्यांना वैमानिक बनविण्याचे ध्येय असल्याचे तंत्रज्ञान विभागाचे म्हणणे आहे.

विद्यापीठातील या अभ्यासक्रमासाठी केवळ सहा विद्यार्थी क्षमता असून, सध्या केवळ एकच विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली. या अभ्यासक्रमाला प्रवेश क्षमता किती, किती विद्यार्थी शिकत आहेत, अभ्यासक्रमावर किती खर्च झाला, असे विविध प्रश्‍न विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्य संतोष ढोरे यांनी उपस्थित केले आहेत. त्यावर विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या उत्तरातून ही माहिती उघड झाली आहे.

 विद्यापीठाने २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून ‘एम टेक इन एव्हिएशन’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अभ्यासक्रम सुरू झाल्यापासून गेल्या पाच वर्षांत केवळ आठ विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे. अभ्यासक्रमाला २०१४-१५ आणि २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या ‘शून्य’ होती. अभ्यासक्रमावर होणारा खर्च आणि त्यासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी यात प्रचंड तफावत दिसत आहे. अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी एका विद्यार्थ्याकडून चार लाख रुपयांचे शैक्षणिक शुल्क घेण्यात येते; तर अभ्यासक्रमासाठी त्या तुलनेत अधिक खर्च होत असल्याचे ढोरे यांनी सांगितले.

अभ्यासक्रम २०१३ मध्ये सुरू केल्यानंतर सहा विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. २०१४ मध्ये अभ्यासक्रमाची जाहिरात दिली नाही. २०१५ मध्ये १९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला. त्यातील एकाच विद्यार्थ्याची निवड केली. या वर्षी (२०१८) जवळपास २४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील पाच जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून दोन विद्यार्थ्यांची निवड केली असून, त्याचे प्रवेश सुरू आहेत.
-डॉ. आदित्य अभ्यंकर, तंत्रज्ञान विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com