पुणे महापालिका रुग्णालयाची प्रसूतिगृह पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज

पुणे शहरातील महापालिकेच्या १५ प्रसूतिगृहांमध्ये दोन वर्षांनंतर प्रथमच नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज येणार आहे.
pregnant women
pregnant womensakal
Summary

पुणे शहरातील महापालिकेच्या १५ प्रसूतिगृहांमध्ये दोन वर्षांनंतर प्रथमच नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज येणार आहे.

पुणे - शहरातील महापालिकेच्या १५ प्रसूतिगृहांमध्ये दोन वर्षांनंतर प्रथमच नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज येणार आहे. महापालिकेची १७ पैकी १५ प्रसूतिगृह आता पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज करण्यात आली आहेत.

देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण पुण्यात होते. त्यामुळे महापालिकेच्या १७ पैकी १५ प्रसूतिगृहांमधील सेवा बंद करावी लागली. कमला नेहरू रुग्णालय आणि सोनवणे प्रसूतिगृह या दोनच महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्रसूतिची सुविधा सुरू ठेवली होती. त्यातही कोरोनाचा संसर्ग नसलेल्या गर्भवतींची प्रसूती कमला नेहरू रुग्णालय होत तर, गर्भवती कोरोनाबाधीत असल्यास तिच्या प्रसूतिसाठी सोनवणे रुग्णालय राखीव ठेवले होते. बंद असलेली प्रसूतिगृहे दोन वर्षांनंतर पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज ठेवल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

प्रसूतीची आकडेवारी

  • महापालिका रुग्णालयात वर्षभरात सहा हजार ६१० प्रसूती झाल्या.

  • कमला नेहरू आणि सोनवणे रुग्णालयांमध्ये बहुसंख्य प्रसूती

  • राजीव गांधी आणि सुतार रुग्णालयात आता सुविधा उपलब्ध

प्रसूतिगृहे बंद का होती?

  • शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा उद्रेक सुरू होता, त्यामुळे सर्व वैद्यकीय आणि पॅरामेडिकल स्टाफ कोरोनाबाधितांच्या रुग्णसेवेत होता.

सुरू करण्यापूर्वी केलेली तयारी

  • महापालिकेची प्रसूतिगृहे सुरू करण्यापूर्वी डागडुजी

  • आवश्यक उपकरणे नव्याने घेतली आहेत.

  • डॉक्टर आणि परिचारिका यांना पुन्हा प्रशिक्षण

  • स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ यांच्याशी संपर्क साधून त्यांची नियुक्ती केली

सुमारे दोन वर्षे महापालिकेची प्रसूतिगृहे कोरोना उद्रेकामुळे बंद होती. आरोग्य विभागातील बहुतांश सर्व डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आणि कर्मचारी कोरोनाच्या नियंत्रणासाठी कार्यरत होते. त्यामुळे या प्रसूतिगृहांचा वापर झाला नाही. आता कोरोना रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाल्याने महापालिकेची प्रसूतिगृहे पुन्हा खुली करण्यात येत आहेत. त्यासाठी तेथे अत्यावश्यक औषधे, उपकरणे उपलब्ध करून दिली.

- डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com