चंदनउटीतून साकारले विठ्ठलाचे रूप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

आळंदी - अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुधवारी माउलींच्या समाधीवर चंदन उटीतून सावळ्या विठ्ठलाचे मनमोहक रूप साकारण्यात आले. आळंदीकर आणि भाविकांनी सायंकाळनंतर चंदनउटीतून रूप पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

आळंदीतील स्वकाम मित्र मंडळ आणि आळंदी देवस्थान यांच्या संयुक्तपणे चंदनउटी अवतार माउलींच्या समाधीवर साकारण्यात आला. या वेळी पुण्यातील कारागिर अभिजित धोंडफळे, माउली मंदिरातील पुजारी योगेश चौधरी, सौरभ चौधरी, तुषार प्रसादे, बबलू प्रसादे, दत्ता केसरी, तेसज केसरी यांनी मिळून माउलींच्या समाधीवर सावळ्या विठ्ठलाचे मनमोहक रूप साकारले. चंदनउटीसाठी आज दुपारी पावणेतीन वाजता दर्शन बंद ठेवण्यात आले. 

समाधीवर उटी सजविण्याचा कार्यक्रम ठिक साडेचारला संपला. त्यानंतर माउलींच्या समाधीवर चंदनउटीतून साकारण्यात आलेले रूप दर्शनासाठी खुले करण्यात आले. या वेळी आळंदीकर आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

Web Title: mauli samadhi chandan uti vittal

टॅग्स