Vidhan Sabha 2019 : मावळ मतदार संघात पहिल्या चार तासात १८.८३ टक्के मतदानाची नोंद

Maval constituency.jpg
Maval constituency.jpg

वडगाव मावळ : मावळ विधानसभा मतदार संघात मतदार रांगा लावून उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रियेत सहभागी झाले असून पहिल्या चार तासात १८.८३ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने कार्यकर्ते व मतदारांचा उत्साह वाढला आहे. 

तालुक्यात दोन दिवस संततधार पाऊस झाल्याने उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र पावसाने सकाळपासून उघडीप दिल्याने मतदानाची प्रक्रिया उत्साहात सुरु झाली. पहिल्या दोन तासात मतदानाचा वेग कमी होता. या कालावधीत केवळ ६.७४ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मात्र मतदानाचा वेग वाढला. सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ मतदानाची नोंद झाली. चार तासात ४० हजार ५९१ पुरुष व २५ हजार ३९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

बहुतेक सर्व केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. गावागावात पक्षीय कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून येत आहे. ते मतदारांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. सर्वत्र मतदानाची प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरु असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुभाष भागडे यांनी दिली. सकाळी आठ ते दहा केंद्रांवरील मतदान यंत्रे नादुरुस्त झाली होती. ती तातडीने बदलण्यात आल्याची माहिती भागडे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com