मावळ पंचायत समिती कर्मचाऱ्यांच्या बदल्या आवश्यक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

टाकवे बुद्रुक - मावळ पंचायत समिती कार्यालयात वीस वर्षा पेक्षा अधिक काळ व पाच वर्ष नोकरी करणार्‍या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदल्या कराव्यात. तसेच  भ्रष्टाचारला आळा घालून भ्रष्टाचार मुक्त मावळ करण्यात यावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते दत्तात्रेय काजळे यांनी केली आहे. 

टाकवे बुद्रुक - मावळ पंचायत समिती कार्यालयात वीस वर्षा पेक्षा अधिक काळ व पाच वर्ष नोकरी करणार्‍या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदल्या कराव्यात. तसेच  भ्रष्टाचारला आळा घालून भ्रष्टाचार मुक्त मावळ करण्यात यावा अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते दत्तात्रेय काजळे यांनी केली आहे. 

माहितीच्या आधारे काजळे यांनी मावळ पंचायत समितीच्या अस्थापना, पशूधन, आरोग्य, बांधकाम आदी विभागातील वीस वर्षा पासून ते पाच वर्षे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता निहाय माहिती उपलब्ध करून यांच्या बदल्यांची मागणी केली आहे. ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे मुख्य सचिव, विभागीय आयुक्त पुणे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या आशयाचे निवेदन काजळे यांनी दिले असून त्याद्वारे ही मागणी केली आहे. पंचायत समितीच्या वेगवेगळ्या विभागातील कर्मचारी जिल्हा परिषदेला सर्वसाधारण बदल्यांचे बोगस प्रस्ताव पाठवून दिशाभूल करीत आहे. कोणाच्या आशीर्वादाने ही मंडळी तालुक्यात इतके वर्षे काम करीत आहे, असा प्रश्न काजळे यांनी उपस्थित केला आहे. 

अनेक वर्षे एकाच जागेवर काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकारी यांचे मुख्य कारण भ्रष्टाचाराशी सबंधित आहे. यांच्या प्रशासकीय बदल्या सेवाज्येष्ठतेनुसार होणे आवश्यक आहे. मात्र दबावतंत्राचा वापर करीत द्वितीय व तृतीय क्रमांक श्रेणीतील कर्मचारी वर्षभरासाठी मावळ तालुक्याच्या बाहेर बदली करून पुन्हा येथे रूजू होत आहे. ३० मे पूर्वी विनंती, प्रशासकीय व सर्वसाधारण बदल्या होणे आवश्यक असताना मावळात मात्र हे चित्र दिसत नाही. वर्षानुवर्षे अधिकारी, कर्मचारी एकाच जागेवर बसून काम करीत आहे. त्यामुळे यांचे वैयक्तीक लागेबांधे व हितसंबंध जोपासले गेले आहे. 

दत्तात्रेय काजळे म्हणाले, "१९९३ ते २०१२ पर्यत रूजू झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा रूजू रिपोर्ट माहितीच्या अधिकारात मिळवून यांची बदली करावी अशी मागणी वरिष्ठ पातळीवर केली. येथे कारवाई न झाल्यास न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली जाईल. कारण इतके वर्षे ही मंडळी एकाच जागेवर कशी नोकरी करीत आहे. या मंडळीचे तालुक्यातील जनतेशी वागणे उद्धटपणाचे आहे. खेडया पाडयातील अशिक्षित व सर्वसामान्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही. आर्थिक लागेबांधे जपले जाते. यातूनच वैयक्तिक व सार्वजनिक योजना दिल्या जातात. 

पंचायत समितीचे गटनेते दत्तात्रेय शेवाळे म्हणाले, "या कर्मचारी व अधिकारी यांना माणसांची पारख झाली. कोणाचे काम करायचे आणि कोणाचे नाही यांचा त्यांनी अंदाज बांधला आहे. मर्जीतील लोकांना मदतीचा त्यांचा कल बनला आहे. त्यामुळे वैयक्तिक लाभाच्या योजना मोजक्या लाभार्थीना मिळतात. सार्वजनिक कामात सत्ताधाऱ्यांना झुकते माप दिले जाते. आर्थीक देवाणघेवाण वाढल्याची शक्यता आहे. 

पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळस्कर म्हणाले, "शासनाने बदल्या संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार बदल्या होणे अपेक्षित आहे. प्रशासनाने या संदर्भात तातडीने कार्यवाही करावी . कोणत्याच कर्मचारी किंवा अधिकारीना पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही.

Web Title: Mawal Panchayat Samiti employees' transfers require