पिंपरी-चिंचवडचे महापौर, उपमहापौरांचा राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांनी राजीनामा देताच त्या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजीनामा दिल्यानंतर महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे आणि उपमहापौर शैलजा मोरे यांनी आज (मंगळवार) राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार दोघांनी पदाचे राजीनामे आयुक्तांकडे सादर केले. महापौर व उपमहापौरपदी जास्तीत जास्त नगरसेवकांना संधी देण्याच्या भाजपच्या धोरणानुसार हे राजीनामे घेण्यात आले आहेत. 

महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांनी राजीनामा देताच त्या पदासाठी इच्छुक असणाऱ्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजीनामा दिल्यानंतर महापौर काळजे व उपमहापौर मोरे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले.

काळजे म्हणाले की, प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आली आणि मला महापौर होण्याचा पहिलाच मान मिळाला. त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. महापौरपदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. अनेक कामे पूर्ण झाली, याचा मला अभिमान वाटतो. मात्र, पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यात अपयश आल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली.

Web Title: Mayor And Deputy Mayor of Pimpri Chinchwad are resigned