उद्या ठरणार पुण्याचा महापौर, उपमहापौर!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

- पुण्याच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.18) अर्ज भरण्यात येणार आहेत. भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार आपापले अर्ज भरतील.

पुणे : पुण्याच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता.18) अर्ज भरण्यात येणार आहेत. भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसचे उमेदवार आपापले अर्ज भरतील. तर, राज्यातील बदलत्या राजकीय स्थितीत शिवसेना काय भूमिका घेणार ? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडीवरूनही नवी राजकीय समीकरणे आकारला येण्याची चिन्हे आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महापौर मुक्ता टिळक आणि उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांची मुदत संपत आल्याने या पदांसाठी येत्या 22 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. महापालिकेत भाजपकडे बहुमत असून, या पक्षाचे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौर आणि उपमहापौरपद भाजपकडेच आहे. दरम्यान, अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत भाजपने "व्हीप' काढला आहे. 

श्रीलंकेचे नवे अध्यक्ष गोताबाया नेमके आहेत तरी कोण?

महापौरपदासाठी भाजप कोणाला संधी देणार ? याची उत्सुकता आहे. मात्र, या पदासाठीच्या उमेदवाराचे नाव सोमवारी रात्री उशिरा किंवा सकाळी जाहीर करण्यात येईल, असे भाजप नेत्यांनी सांगितले. दुसरीकडे मात्र, पहिले अडीच वर्ष उपमहापौरपद "आरपीआय'ला दिल्याने आता हे पद आपल्याकडेच ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे दोन्ही पदांसाठी भाजपचेच उमेदवार असतील का, याचीही उत्सुकता आहे. 

मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार

दोन्ही कॉंग्रेसच्या आघाडीतर्फे महापौर आणि उपमहापौरपदांसाठी उमेदवार दिले जाणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी महापौर तर कॉंग्रेस उपमहापौरपदाचा उमेदवार देणार आहे. या निवडणुकांत शिवसेनेची साथ मिळविण्याचा दोन्ही कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपसोबत राहणार नसल्याचे सांगणाऱ्या शिवसेना कॉंग्रेस आघाडी साथ देण्याबाबतही भूमिका मांडलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayor and deputy mayor of Pune will be decide on tomorrow