मुळा-मुठेच्या पूररेषेतील अतिक्रमणे काढण्याचे महापौरांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑगस्ट 2019

शहरातील विविध भागांतील सुमारे साडेअकराशे घरांत पावसाचे पाणी शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील पूरग्रस्तांचे नुकसान झाले असून, त्यांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले आहे.

पुणे : मुळा-मुठा नदीच्या पूररेषेतील व्यावसायिक आणि अन्य प्रकारची अतिक्रमणे तातडीने काढण्याचा आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिला. नदीचा प्रवास सुरळीत राहून, पुण्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

शहरातील विविध भागांतील सुमारे साडेअकराशे घरांत पावसाचे पाणी शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील पूरग्रस्तांचे नुकसान झाले असून, त्यांचे जिल्हा प्रशासनाने पंचनामे केले आहे. या लोकांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करण्यात येणार आहे. घरांचे पंचनामे झाले आहेत का ? पूरग्रस्तांना महापालिकेकडून काही मदत करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांच्यासमवेत शुक्रवारी बैठक झाली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, सौरभ राव उपस्थित होते.

दरम्यान, शहरातील पूरग्रस्तांसाठी घरांची बांधणी करण्यासाठी 25 हजारांची मदत करावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mayors order to remove encroachments on Mula and Mutt floodline