महापौरबदलाच्या चर्चेला उधाण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पुणे - मुक्ता टिळक यांचे महापौरपद आणखी सव्वा वर्षे टिकणार की नाही, हा सध्या पुणे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जाणारा प्रश्न आहे.

पुणे - मुक्ता टिळक यांचे महापौरपद आणखी सव्वा वर्षे टिकणार की नाही, हा सध्या पुणे महापालिकेच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जाणारा प्रश्न आहे.

महापौर पदाचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असला तरी, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेसने महापालिकेच्या कार्यकाळात प्रत्येकी सव्वा वर्षाचा कालखंड महापौर पदासाठी निश्‍चित केला होता. त्यामुळे पाच वर्षांत चार जणांना संधी मिळाली होती. टिळक यांच्या महापौरपदाला 15 जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यामुळे महापौरपदाच्या बदलाची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यात जातीय समीकरणांचा संदर्भ दिला जात आहे.

महापौर बदलले गेले तर, पुढच्या कार्यकाळात लोकसभा, विधानसभा निवडणुका आहेत. त्याचाही विचार केला जात आहे. टिळक मधल्या काळात आजारी होत्या. मात्र सध्या "महापौर आपल्या दारी' या कार्यक्रमातून त्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे. भाजपमध्ये 98 नगरसेवक आहेत. सध्याचे महापौरपद खुल्या गटासाठी राखीव आहे. त्यामुळे बदल झाल्यास नव्या चेहऱ्याला संधी मिळू शकते. खुल्या गटातील इच्छूक महिला नगरसेविकांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली असून त्यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत.

धोरणात्मक निर्णय होणार !
याबाबत भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, 'महापौरबदलाचा प्रश्‍न केवळ पुण्याचा नाही; तर राज्यातील 11 महापालिकांमध्ये आहे. त्याबाबतचा निर्णय प्रदेश स्तरावर होणार आहे. त्यासाठीची बैठक जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्‍यता आहे. त्यामध्ये याबाबतचा धोरणात्मक निर्णय होईल आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल.''

Web Title: mayour changes discussion poliics