मयूर गोरडे यांनी देशसेवेबरोबर निसर्गसेवा करत जखमी घुबडाचे प्राण वाचविले 

junnar
junnar

जुन्नर - सुट्टीवर घरी आलेल्या मयूर गोरडे या सैनिकाने देशसेवेबरोबर निसर्गसेवेचा आदर्श घालून देत पक्षी वाचवा हा संदेश दिला आहे. त्यांच्यामुळे रात्रीच्या वेळी चारचाकी वाहनाची धडक बसल्याने जखमी झालेल्या शृंगी प्रजातीच्या घुबडाला जीवदान मिळाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे

याबाबतची माहिती अशी की, मंगळवारी ता.27 रोजी रात्री दहाच्या सुमारास मयूर गोरडे दुचाकीवरून बस्ती-सावरगाव ता.जुन्नर येथे आपल्या राहत्या घरी जात होते. ते सद्या अरुणाचल प्रदेश येथे सैन्यात हवालदार म्हणून कार्यरत असून ते सुट्टीवर गावी आले आहेत. रात्री दहाच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना हा पक्षी ओमिनी मारुती व्हॅन गाडीस धडकुन खाली रस्त्यावर कोसळला होता. गाडी निघून गेली होती परंतु पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या या देशसैनिकाचे लक्ष या पक्षाकडे गेले. तो जखमी झाला होता हे पाहून क्षणाचा विलंब न करता त्यास उचलून एका हातात पक्षी तर एका हाताने दुचाकी चालवत त्यांनी जुन्नरला वनरक्षक माजी सैनिक रमेश खरमाळे यांच्याकडे पक्षाचा जीव वाचवण्यासाठी सुपूर्त केला. 

खरमाळे यांनी याबाबत डॉ. अजय देशमुख यांना याबाबत कळविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यास चमचाने पाणी दिले. पुढील उपचारासाठी माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात पाठविले. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी हा पक्षी शृंगी घुबड प्रजातीतील असल्याचे सांगितले त्याच्या डोळ्याला मार लागल्याने देशमुख यांनी त्याचेवर उपचार सुरू केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com