एमबीए आणि प्रगती

Sakal-Vidya
Sakal-Vidya

कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात.
- प्रा. सुनीता मंगेश कराड (संचालिका मिटकॉम, एमआयटी-एडीटीविद्यापीठ)

मोजक्‍या कालावधीत व्यवस्थापनाचे ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यासाठी एमबीए हा उत्तम अभ्यासक्रम ठरू शकतो. कोणत्याही व्यवसायात नफा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट्य असते. त्यासाठी एमबीए हा उत्तम अभ्यासक्रम मानला जातो. या अभ्यासक्रमात मानवसंसाधन व्यवस्थापन, फायनान्स व्यवस्थापन, कृषी व्यवस्थापन, फायनान्स मॅनेजमेंट, मार्केटिंग मॅनेजमेंट, माहिती तंत्रज्ञान व्यवस्थापन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय व्यवस्थापन (इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट), कृषी व अन्नव्यवस्थापन, बांधकाम व्यवस्थापन, प्रॉडक्‍ट लिडरशीप मॅनेजमेंट, डेटासायन्स यांचा समावेश होता.

हा अभ्यासक्रम शिकवीत असताना विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट जगतात नाव कमविण्यासाठी व्यवस्थापकीय तंत्र, संस्थात्मक व्यवस्थापकीय तंत्र, व्यक्तिमत्त्व विकासाचे तंत्र, विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविणे, भाषेवरील प्रभुत्व, सादरीकरणाचे तंत्र इत्यादी बाबींवर विशेषकरून भर दिला पाहिजे. याशिवाय नवीन व्यावसायिक निर्माण करण्यासाठीचे तंत्र व आपापल्या क्षेत्रातील नेतृत्व विकास यावर जोर दिला पाहिजे. सध्या माहिती आणि तंत्रज्ञानक्षेत्रात झपाट्याने बदल  होत  आहेत. या बदलामुळे नवनवीन बाबींचा अंतर्भाव अभ्यासक्रमात होणे गरजेचे असते. एमबीएच्या अभ्यासक्रमात काळानुरूप बदल करून नवतंत्रज्ञानाची सांगड घालता आली पाहिजे. कोणत्याही युवकांसाठी एमबीए पदवीधर असणे ही एक प्रतिष्ठेची बाब असू शकते. एमबीए करत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. विविध कंपन्यांतील उच्चपदस्थ अधिकारी आघाडीच्या बी-स्कूल्समधून एमबीए पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे डोळे लावून बसलेले असतात.

क्षेत्रीय ज्ञान ही काळाची गरज
महत्त्वाच्या मॅनेजमेंट शिक्षणसंस्थांमध्ये एचआर, मार्केटिंग, फायनान्स आणि सिस्टिम्स अशा विषयांत स्पेशलायझेशन करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध असतो. तुम्ही जरी समाजविज्ञान या विषयातील पदवीधर असलात, तरी तुम्ही मार्केटिंग किंवा मनुष्यबळ व्यवस्थापन(एचआर) या विषयांत स्पेशलायझेशन करू शकता. विविध व्यवस्थापन क्षेत्रातील इत्थंभूत माहिती असणे ही आजच्या युगाची महत्त्वाची गरज बनली आहे. त्यासाठी व्यवस्थापनशास्त्र शिकविणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून व्यवस्थापनशास्त्राशी निगडित असलेल्या सर्व विषयाचे ज्ञान प्राप्त करून दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या संस्थांनी काही ठरावीक औद्योगिक कंपन्यांमध्ये जसे की मायक्रो, महिको, प्रवीण मसाले, बीजोत्पादन कंपन्या, इफ्को यासारख्या अन्य कंपन्यांमध्ये इंटर्नशिप कार्यक्रम राबविला पाहिजे. तसेच काळानुसार बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती ही विद्यार्थ्यांना दिली पाहिजे.

बांधकाम व्यवस्थापन सध्याचे आव्हान
बांधकाम व्यवस्थापनाला प्रोजेक्‍ट कन्स्ट्रक्‍शन मॅनेजमेंट असेही म्हणतात. केंद्र सरकारच्यावतीने सादर केलेल्या अर्थसंकल्पात रस्ते, नागरीविकास, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

यात रस्ते, नदीवरील पूल, लहानपूल, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, समृद्धी महामार्ग, द्रुतगती महामार्ग, मेट्रो, रेल्वे रुंदीकरण, विमानतळ, बोगद्यांची निर्मिती यांच्यावर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

देशात १०० स्मार्टसिटींची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात स्थापत्य अभियांत्रिकी आणि प्रोजेक्‍ट कन्स्ट्रक्‍शन मॅनेजमेंटसाठी अच्छे दिन येणार आहे. स्थापत्यशास्त्र अभियांत्रिकी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सीबीआरई, जीईआरए, मिलेनियम कन्स्ट्रक्‍शन, जे-कुमार, पंचशील इत्यादी कंपन्यांमध्ये नोकरीची मोठ्या प्रमाणात संधी आहे.

एमबीए इन बिग डेटासायन्स
विविध प्रकारच्या माहितीचे पुनर्प्राप्ती, साठवण, प्रक्रिया, विश्‍लेषण आणि व्यवस्थापन कसे करावे, हे या विद्याशाखेत शिकवले जाते. विविध प्रकारच्या डेटाचे महत्त्व समजून घेऊन त्याचा उपयोग व्यवस्थापनासाठी करावा. डेटासायन्स कार्यक्रमाचा उद्देश औद्योगिक समस्यांसाठी तातडीच्या आणि अचूक तंत्रज्ञानाचा विकास करण्यासाठी आणि विविधसेवा विकासासाठी माहितीचे अन्वेषण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रदान करणे हा या विद्याशाखेचा उद्देश आहे. बिग डेटासायन्स, तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि प्रॉडक्‍टलिडरशीप डेव्हलपमेंट हे नवीन अभ्यासक्रम नव्याने व्यवस्थापनशास्त्रमध्ये अंतर्भूत करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपन्यांमध्ये या अभ्यासक्रमाला मोठी संधी आहे.

माहिती तंत्रज्ञानातील आताच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उपलब्ध करून देणे हे सर्वांसाठी आव्हानाचे काम आहे. हा अभ्यासक्रम काही मोजक्‍या शिक्षणसंस्थांमध्ये उपलब्ध आहे.

कार्यकारी व्यवस्थापन
एखाद्या कंपनीतील उच्चस्तरीय कामाचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींचा अभ्यास या विद्याशाखेच्या माध्यमातून शिकवला जातो. नामांकित कंपन्यांमध्ये कामावर रुजू असताना स्वतःची पात्रता वाढविण्यासाठी आणि नेहमीच्या कामात बदल करण्यासाठी कार्यकारी व्यवस्थापन शिक्षण मोठे दालन म्हणून पुढे आले आहे. विविध नामांकित कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी किंवा स्वतः मालक यासारख्या अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण देतात.

स्वतंत्र व्यवसाय व नेतृत्वविकास
उभरत्या व्यवस्थापकांसाठी किंवा नव्याने उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी मोलाचा ठरू शकतो. तुम्हाला जर उद्योजक व्हायचे असेल, तर तुम्ही एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन सेल्स, मार्केटिंग, बिझनेस प्लॅनिंग, फायनान्स आदी बाबींची मूलभूत तत्त्वे शिकू शकता. उद्योजक होण्यासाठी एमबीए असण्याची गरज नसते; पण एमबीए असाल, तर त्याचा फायदा होतो, हे निश्‍चित. उद्योजक म्हणून स्वतःला घडवायचे असेल, तर मॅनेजमेंट संस्थेचे शिक्षण महत्त्वाचे ठरते. मोजक्‍या कालावधीत विविध प्रकारचे ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त करण्यासाठी एमबीए हा उत्तम अभ्यासक्रम ठरू शकतो. तुमच्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या कामात करता आणि ते इतरांबरोबर शेअर करता, तेव्हा तुमची प्रगती अधिक वेगाने होते. त्यामुळे प्रगतीसाठी ज्ञानार्जन हा तुमचा हेतू असेल, तर बी-स्कूल ही त्या ज्ञानार्जनासाठीची जागा आहे. नेतृत्व व व्यक्तिमत्त्वविकास, निर्णय क्षमतेत वाढ यासारख्या बाबींचा ही विकास या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून साधता येतो.

कृषी व अन्न व्यवस्थापन शास्त्र
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतीउद्योगात ही नवनवी आव्हाने उभी राहत आहेत. या आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी शेतीव्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच अद्ययावत व्यवस्थापन तंत्रांची आवश्‍यकता आहे. या दृष्टिकोनातून कृषी व अन्न व्यवस्थापनशास्त्र या स्पेशलायझेशनकडे पाहिल्यास ग्रामीण व कृषी उद्योग या विषयीचे महत्त्व समजते आणि उपलब्ध संधींची कल्पना येऊ शकते. विपणनविषयक उपघटकात शेतीमालाचे उत्पादन तसेच पूरक उद्योगामध्ये वस्तूंचे उत्पादन केल्यानंतर त्यांचे शास्त्रीयदृष्ट्या, विपणनाची आधुनिक तंत्रे वापरून या मालाचे प्रभावी विपणन कसे करता येईल हे शिकता येते. त्यादृष्टीने ग्रामीण बाजारपेठांचे संशोधन कसे करावे, वितरणसाखळी ग्रामीण भागात कशा पद्धतीने वापरता येईल, याविषयी वस्तूंचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग तसेच जाहिरात कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com