Pune News : डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! ससूनच्या इमारतीवरून पडून MBBS विद्यार्थिनीचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBBS student dies after falling from Sassoon hospital building in Pune

Pune News : डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं! ससूनच्या इमारतीवरून पडून MBBS विद्यार्थिनीचा मृत्यू

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून पडल्याने वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. बुधवारी ससून रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली होती. याघटनेत ही विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाली होती. उपचारादरम्यान या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान अदिती दलभंजन असं मृत तरुणीचं नाव असून ती बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अदिती ही एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती.

सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अदिती ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीच्या छतावर गेली. तेथून खाली पडल्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला. गंभीर अवस्थेत अदितीला तातडीने उपचारासाठी आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांकडून तिचा जीव वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मात्र तिने नैराश्येतून तसेच अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

टॅग्स :Pune NewsMBBS students