एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची उरुळी कांचनमध्ये आत्महत्या

एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची उरुळी कांचनमध्ये आत्महत्या

उरुळी कांचन - पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या (एमबीबीएस) शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज पहाटे उघडकीस आला. 

अनिकेत संजय धुमाळ (वय २२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे त्याचे नाव आहे. अभ्यासाच्या तणावातून अनिकेतने आत्महत्या केल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. याप्रकरणी अनिकेतचे वडील संजय दत्तात्रेय धुमाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांच्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील डॉ. अर्चना धुमाळ यांना अनिकेत व सुयश अशी दोन मुले आहेत. थोरला अनिकेत हा पुण्यातील भारती विद्यापीठात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिकत होता. अनिकेतसह घरातील सर्वजण बुधवारी रात्री अकराच्या सुमारास आपापल्या खोलीत झोपले होते. वडील संजय यांनी पहाटे तीनच्या सुमारास अनिकेतला अभ्यासासाठी झोपेतून उठवले. यावर अनिकेतने वडिलांना सांगितले की, तुम्ही झोपा मी माझा अभ्यास करतो. त्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास अनिकेत अभ्यास करतो की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी अनिकेतच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र खोलीतून प्रतिसाद न मिळाल्याने  संजय व त्यांची पत्नी डॉ. अर्चना यांनी दरवाजा जोरात धक्का देऊन उघडला. त्या वेळी अनिकेतचा मृतदेह खोलीतील पंख्याला लटकलेला आढळला. अनिकेतने शालच्या साह्याने गळफास लावून घेतल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती संजय धुमाळ यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिली. 

कुटुंबीयांना धक्का
अनिकेतच्या आई डॉ. अर्चना धुमाळ या उरुळी कांचन परिसरात नामांकित डॉक्‍टर आहेत. त्यांचा महात्मा गांधी रस्त्यावर दवाखाना आहे. अनिकेत एक हुशार विद्यार्थी म्हणून उरुळी कांचन परिसरात ओळखला जात होता. अनिकेतसारख्या हुशार विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केल्याने कुटुंबीयांसह उरुळी कांचन परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com