पुण्यात झळकलं 'मी पण सावरकर' पोस्टर! 

टीम ई-सकाळ
सोमवार, 16 डिसेंबर 2019

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या संविधान बचाओ रॅलीत केलेल्या सावरकरांच्या उल्लेखावरून देशभरात राहुल गांधींच्या विरोधात टीका होत आहे. आज, महाराष्ट्रात नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात त्याचे सडसाद उमटले. तर, सायंकाळी मी पण सावरकर आंदोलन पुण्यात येऊन थडकले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीच्या संविधान बचाओ रॅलीत केलेल्या सावरकरांच्या उल्लेखावरून देशभरात राहुल गांधींच्या विरोधात टीका होत आहे. आज, महाराष्ट्रात नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात त्याचे सडसाद उमटले. तर, सायंकाळी मी पण सावरकर आंदोलन पुण्यात येऊन थडकले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय आहे प्रकरण?
झारखंडच्या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. मोदींनी मेक इन इंडियाचं स्वप्न दाखवलं आणि देशाची अवस्था रेप इन इंडिया अशी झाली आहे. यावरून संसदेत गदारोळ झाला आणि राहुल गांधी यांच्या माफीची मागणी भाजपनं सुरू केली. त्या वक्तव्यावर माफी न मागण्यावर राहुल गांधी ठाम होते. दिल्लीत काँग्रेसच्या संविधान रॅलीत माफी मागणार नाही, हे सांगताना माफी मागायला माझं नाव राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, असं वक्तव्य केलं. त्यावरून भाजप नेत्यांनी राहुल यांच्याविरोधात जोरदार टीका सुरू केली आहे. 

आणखी वाचा - ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? फडणवीसांचा सवाल

पुणे शहरात पोस्टर 
सावरकरांविषयीच्या राहुल गांधींच्या वक्तव्याचा वादा पुण्यापर्यंत आला आहे. पुण्यात अलका टॉकीज चौकात सायंकाळी एक पोस्टर झळकले असून, त्या पोस्टरवर कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह नाही. योगेश शाडिल्य (तिवारी) यांनी हे पोस्टर झळकवले आहे. त्यावर योगेश यांचे नावही आहे. हे पोस्टर पक्षीय नसलं तरी त्याला राजकीय रंग असल्याची चर्चा सध्या पुण्यात सुरू झाली आहे. 

No photo description available.

भाजप आक्रमक
नागपूरच्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनात आज, भाजप सदस्यांनी भगव्या टोप्या घालून विधिमंडळ परिसरात प्रवेश केला. टोप्यांवर मी पण सावरकर असे लिहिले होते. 
सभागृहात मंत्री जयंत पाटील यांचे भाषण सुरू असताना भाजप सदस्यांनी तेथे बॅनरबाजी केली. दरम्यान, राहुल गांधी चुकीचं काहीच बोलले नाहीत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मीडियाशी बोलताना राहुल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: me pan savarkar poster at alka talkies chowk pune