पुणेकरांनो, आखाडाच्या शेवटच्या रविवारी मटन, चिकन, मासे मिळणार 'या' वेळेत

meat, chicken, fish will available in the morning time on the Sunday in Pune for Akhad party
meat, chicken, fish will available in the morning time on the Sunday in Pune for Akhad party

पुणे : आखाड महिन्यातील शेवटचा रविवार (ता. 19) घरोघरी धूमधडाक्यात होण्याची चिन्हे आहेत. कारण रविवारी मटन, चिकन, मासे, अंडी आदींची दुकाने सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान सुरू राहणार आहेत, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गर्दी होईल, हे लक्षात घेऊन संबंधित व्यापाऱयांनीही तयारी सुरू केली आहे. 

लॉकडाउनमध्ये रविवारपासून किराणा, भाजीपाला, फळ बाजार 'या' वेळात राहणार सुरू 
सोमवारी (ता. 20) आषाढी अमावस्या आहे. मंगळवारपासून (ता. 21) श्रावण महिना सुरू होणार आहे. अनेकजण सोमवारी मांसाहरी पदार्थ खात नाहीत. तसेच श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रम- उपक्रमांची संख्या मोठी असते. त्यामुळे शाकाहारावरच अवलंबून राहणाऱयांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे मांसाहरी पदार्थ खाणारयांसाठी रविवार हा तसा अखेरचा आहे. त्याचे प्रतिबिंब सोशल मीडियावरही उमटले. अनेक व्हॉटसअप ग्रूपमध्ये रविवारचा मेनू ठरविण्यात येत होता. तसेच त्यांची रेसिपीही शेअर केली जात होती. 

शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात 23 जुलैपर्यंत लॉकडाउन जिल्हा प्रशासनाने जाहीर केला आहे. यातील पहिला टप्पा शनिवारी संपणार आहे. रविवारपासून (ता. 19) गुरुवारपर्यंत (23 जुलै) दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्यात किराणा दुकाने भाजीपाला मार्केट आणि फळ बाजार सुरू राहणार आहे. त्या पुढे लॉकडाउनमधील शिथिलतेबाबतचा निर्णय 22 जुलै रोजी होणार आहे. यावेळी लॉकडाउनचा निर्णय 9 जुलै रोजी जाहीर झाला होता. त्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यास 4 दिवसांचा अवधी मिळाला होता. त्या काळात नागरिकांनी पुरेशी तयारी करून घेतली होती. आता उद्यापासून मटन, चिकन, मासे आणि अंडी यांचीही दुकाने उघडी राहणार असल्याचे महापालिकेने 12 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या आदेशात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

गेल्या रविवारीही (ता. 12 जुलै) शहरात चिकन, मटन, मासे आणि अंड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात झाली होती. त्या दिवशी सुमारे 750 टन चिकन शहरात विकले गेले होते. तर शहरात सुमारे रविवारी 2500 ते 3000 बोकड लागतील, असा अंदाज मटन विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी व्यक्त केला. रविवारी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे वेळ वाढवून मिळावी म्हणून प्रशासनाकडे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. 

 कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात मटन, चिकनची फारशी विक्री झाली नव्हती. त्यामुळे त्यांचे दर कोसळले होते. मात्र, रोगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी मांसाहरी पदार्थ उपयुक्त ठरतात, असे काहीजण सांगत आहेत. त्याचे व्हॉटसअप मेसेजही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे मटन, चिकन, माशांचा खप पुन्हा वाढला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Edited By : Sharayu Kakade

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com