न्यायालयात यांत्रिक वाहनतळ

न्यायालयात यांत्रिक वाहनतळ

पुणे - जिल्हा न्यायालयात असलेल्या चारचाकी वाहनतळाचा प्रश्‍न कायमचा मिटण्याची शक्‍यता आहे. न्यायालयात उभारण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या आराखड्यामध्ये भूमिगत यांत्रिक वाहनतळाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

न्यायालयातील जुन्या इमारतीमध्ये अशोक हॉलसमोर असलेल्या जागेत केवळ चारचाकी वाहनांसाठी हे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. सध्या या ठिकाणी बगीचा असून, प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर तेथील झाडे इतरत्र हलविण्यात येतील. वाहनतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर ती झाडे आणि बगीचा पुन्हा तयार करण्यात येणार आहे. अशोक हॉलसमोर असलेल्या ४ हजार ९८ चौरस मीटर जागेमध्ये हा यांत्रिक वाहनतळ उभारण्यात येणार आहे. वाहनतळाची उंची जास्त ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी हायड्रॉलिक पद्धतीने दोन वाहने एकावर एक या पद्धतीने उभी करता येणार आहेत.

आराखड्यानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यास त्या ठिकाणी सुमारे ३५० चारचाकी वाहने उभी करता येऊ शकतील. दरम्यान, याच परिसरात बराकीच्या ठिकाणी नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीचा तीनपैकी एक आराखडा निश्‍चित करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १५२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्यातूनच या भूमिगत वाहनतळासाठी निधी दिला जाईल. सध्या हा प्रस्ताव मंजुरीसाठी उच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आला आहे. 

बराकीच्या ठिकाणी तयार होत असलेल्या इमारतीमध्ये दुचाकी पार्क करण्यासाठी दोन मजले राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यात सुमारे ४ हजार दुचाकी व ४०० चारचाकी वाहने पार्क करता येऊ शकतील. सध्या जिल्हा न्यायालयात सुरक्षा भिंतीच्या कडेने वाहने पार्क करण्याची सुविधा आहे. मात्र, न्यायालयात येणाऱ्या पक्षकार आणि वकिलांची संख्या विचारात घेता उपलब्ध जागा कमी पडत आहे. त्यामुळे पार्किंगची पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. 

हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यास न्यायालयात असलेला वाहनतळाचा प्रश्‍न कायमचा सुटू शकतो.

वाहने उभी करण्यासाठी जागा हा न्यायालयातील अत्यंत जटिल प्रश्‍न आहे. जागा अपुरी असल्यामुळे अनेकदा इमारतीभोवती कोंडी होते; तर काही वकील व पक्षकार न्यायालयाच्या बाहेर वाहने लावतात. त्यामुळे बाहेरदेखील वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे चारचाकी वाहनांसाठी भूमिगत वाहनतळ झाल्यास आतील आणि बाहेर रस्त्यावरील कोंडी कमी होईल. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न असतील. 
- ॲड. श्रीकांत आगस्ते, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक 
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.  

#SakalSamvad #WeCareForPune 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com