वैद्यकीय महाविद्यालय लवकरच उभारणार

Doctor
Doctor

पुणे - भारतीय जनता पक्षाने अजेंडा म्हणून आखलेली भारतरत्न अटलबिहारी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या योजनेला आता प्रारंभ होणार आहे. 

गेली दोन वर्षे रखडलेली या योजनेवरून सत्ताधाऱ्यांनी महापालिका आयुक्तांवर निशाण साधत महाविद्यालयाच्या सल्लागाराला कामाचा आदेश (वर्क ऑर्डर) दिला आहे. त्यामुळे हे महाविद्यालय सुरू करण्याच्या प्राथमिक आता कामांना सुरवात होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

या वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महापालिकेत सत्ता येताच भाजपने आपला अजेंडा जाहीर केला होता. त्यातून वाजपेयी यांच्यासह डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने योजना जाहीर केल्या होत्या. 

त्यासाठी महापालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात दहा कोटींची तरतूद होती. परंतु गेल्या दोन वर्षांत त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ही योजना रखडल्याचे सांगण्यात येत होते. मात्र नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी आयुक्त सौरभ राव यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला. त्यावरून पदाधिकारी व प्रशासनात खडाजंगीही झाली होती. त्यानंतर सल्लागाराला आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. पुढील टप्प्यांतील हे कामे होतील, असे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारणे, तिची योग्य आणि आर्थिक बाबींचा अंदाज सल्लागाराकडून येईल. त्यानंतर प्रत्यक्ष महाविद्यालय सुरू करण्याच्या सृष्टीने पावले टाकण्यात येतील.
- डॉ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, महापालिका  

शहराच्या दृष्टीने महाविद्यालय सुरू करणे महत्त्वाचे आहे. परंतु त्यावर कार्यवाही झाली नव्हती. आता सल्लागाराला कामाचा आदेश दिला आहे. मात्र त्यानुसार कामे करण्यावर भर देण्याची गरज आहे.
- मुरलीधर मोहोळ, माजी अध्यक्ष, स्थायी समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com