महत्त्वाची बातमी! वैद्यकीय परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत झालाय निर्णय; आता...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 26 June 2020

वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यावर नाराजीचा सूर उमटल्याने जुलैमधील परीक्षा स्थगित झाली.

पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यावर नाराजीचा सूर उमटल्याने जुलैमधील परीक्षा स्थगित झाली असून, परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर केले जाणार आहे. याबाबत वैद्यकीय शिक्षण अवर सचिव डॉ. श्रीनिवास कोतवाल यांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयास आदेश दिले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचे राज्य सरकारचे धोरण असताना वैद्यकीय परीक्षा रद्द करण्याची कायद्यात तरतूद नाही. त्यामुळे या परीक्षा होणार आहेत. यासाठी परीक्षेबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन परीक्षेचा आराखडा तयार केला होता. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने १६ जुलै ते २२ जुलै २०२० अशी सलग परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले होते. तसेच त्यात प्रत्येक विद्यार्थ्यांचा ५ लाखाचा विमा काढण्यासाठीही सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. यावरून विद्यार्थ्यांच्या जीवाची किंमत फक्त ५ लाख आहे का? असा प्रश्न विचारत विद्यापीठावर टीका झाली होती.

medical ...

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच सलग परीक्षेलाही विरोध होता. यासंदर्भात बुधवारी कोतवाल यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना आदेश दिले आहेत. यामध्ये परीक्षा सुरू होण्याच्या तारखेपूर्वी ४५ दिवस आधी विद्यापीठाने वेळापत्रक जाहीर करावे. परीक्षेच्या एका पेपरनंतर दरवर्षीप्रमाणे एका दिवसाचे अंतर ठेवावे अले असे आदेशात नमूद केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या आदेशामुळे जुलै महिन्यात वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच भविष्यात कोरोनाची स्थिती पाहून परीक्षेचे नियोजन करावे लागणार आहे. या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जिल्हात होणार असल्या तरी अनेकांना ५० किलोमीटरपर्यंत प्रवास करावा लागणार आहे, त्यासाठी वाहतूकीची सुविधाही उपलब्ध केली जावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Exam schedule will be announced 45 days in advance