"आरोग्य वर्धिनी' सेवेचे आरोग्य बिघडणार ?

डी. के. वळसे पाटील
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्‍यात 150 आरोग्य वर्धिनी केंद्रात वैद्यकीय सेवा तत्पर मिळाव्यात म्हणून खासगी वैद्यकीय व्यवसाय सोडून 15 डॉक्‍टर समुदाय आरोग्य अधिकारीपदाचे प्रशिक्षण मंचर उपजिल्हा रुग्णालयात घेत होते. पण येथील प्रशिक्षण केंद्र बंद करून प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांना शुक्रवारपासून (ता. 8) पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याचा आदेश आरोग्य विभागाने काढला आहे. प्रवास, वेळ वाया जात असल्याने व निवासाची सोय नसल्याने पुण्यात होणाऱ्या प्रशिक्षणाकडे डॉक्‍टरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य वर्धिनी केंद्रातील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मंचर (पुणे) : आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्‍यात 150 आरोग्य वर्धिनी केंद्रात वैद्यकीय सेवा तत्पर मिळाव्यात म्हणून खासगी वैद्यकीय व्यवसाय सोडून 15 डॉक्‍टर समुदाय आरोग्य अधिकारीपदाचे प्रशिक्षण मंचर उपजिल्हा रुग्णालयात घेत होते. पण येथील प्रशिक्षण केंद्र बंद करून प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांना शुक्रवारपासून (ता. 8) पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याचा आदेश आरोग्य विभागाने काढला आहे. प्रवास, वेळ वाया जात असल्याने व निवासाची सोय नसल्याने पुण्यात होणाऱ्या प्रशिक्षणाकडे डॉक्‍टरांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य वर्धिनी केंद्रातील आरोग्य सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सध्या खेडेगावात वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्‍टरांची निकषानुसार प्रशिक्षणासाठी निवड केली होती. नऊ महिला व सहा पुरुष अशा एकूण 15 डॉक्‍टरांना 9 ऑगस्ट 2019 पासून मंचरला प्रशिक्षण दिले जात होते. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच व रात्री आठ ते सकाळी आठ असे एकूण 21 तास प्रशिक्षणाची वेळ होती. या प्रशिक्षणार्थींचा फायदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना होत होता. त्यांना चांगली आरोग्य सेवा मिळत होती. सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागाच्या वतीने या डॉक्‍टरांच्या नियुक्‍त्या ग्रामीण भागातील आरोग्य वर्धिनी केंद्रात केल्या जाणार होत्या, अशी माहिती प्रशिक्षणार्थी डॉ. अनिल सोमवंशी यांनी दिली.

अचानकपणे शुक्रवारी (ता. 8) मंचर उपजिल्हा रुग्णालयातील प्रशिक्षण केंद्र बंद करण्यात आले. या डॉक्‍टरांना सिंहगड भागातील काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये उर्वरित प्रशिक्षण घेण्याविषयी आदेश काढले आहेत. तेथे ये-जा करणे गैरसोयीचे असल्याने प्रशिक्षण अर्धवट सोडण्याचा निर्णय प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांनी घेतला आहे.
डॉ. विशाल डोळस, राजगुरुनगर

मंचर उपजिल्हा रुग्णालयातील समुदाय आरोग्य अधिकारी प्रशिक्षण केंद्र बंद करू नये. या मागणीसाठी प्रशिक्षणार्थी डॉक्‍टरांचे शिष्टमंडळाने मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे सहसंचालक डॉ. विजय कुंदेवाड यांना भेटले. पण ते व्यवस्थित बोलले नाहीत. कार्यालयाच्या बाहेर निघा, अशी उद्धट भाषा त्यांनी वापरली.
डॉ. विनोद ढवळे, नारायणगाव

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Medical Fecility Affected I