औषध विक्रेत्यांची ‘एफडीए’कडून तपासणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

पुणे - डॉक्‍टरांनी औषधाच्या चिठ्ठीत लिहून दिल्यापेक्षा जास्त गोळ्या रुग्णाच्या माथी मारणाऱ्या औषध विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कसून चौकशी सुरू केली आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर औषध विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ‘एफडीए’च्या 
अधिकाऱ्यांनी दिली. 

डॉक्‍टरांनी दिलेल्या सल्ल्यापेक्षा जास्त गोळ्यांची विक्री औषध दुकानदारांकडून होत असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याबाबत ग्राहकांनी दूरध्वनीवरून दिलेली तक्रार आणि वृत्त या आधारावर धायरी फाटा येथील पवन मेडिकलची तपासणी सुरू केली आहे. 

याबाबत ‘एफडीए’चे सहायक आयुक्त एस. एस. मोहिते म्हणाले, ‘‘औषध निरीक्षकांकडून संबंधित दुकानाची तातडीने तपासणी सुरू केली आहे. या प्रकरणातील सर्व बाजू तपासल्या जातील. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.’’

‘एफडीए’च्या पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर म्हणाले, ‘‘डॉक्‍टरांनी लिहून दिल्यापेक्षा जास्त औषधे देणाऱ्या दुकानदारांची तपासणी करण्यात येत आहे. त्यात दोषी आढळलेल्यांवर निश्‍चित कारवाई करण्यात येईल.’’

Web Title: medicine sailing cheaking by fda