पाण्याबाबत लवकरच बैठक 

पाण्याबाबत लवकरच बैठक 

पुणे - शहर आणि उपनगरांत रहिवाशांना रोज एकवेळ पाणीपुरवठा केला जात असून, पाणीकपातीबाबत कोणत्याही हालचाली नाहीत. मात्र, ती करण्याआधी पालकमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधारी-विरोधी पक्षांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. शिवाय विविध घटकांतील नागरिकांशी चर्चा करून पाणीकपात आणि अन्य उपाययोजनांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. 

दरम्यान, पाणीकपात आणि त्याबाबतचे नवे वेळापत्रक तयार करण्यात येत नसल्याचेही पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. 

शहराच्या पाणीसाठ्यात कपात करावी लागेल, असा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिला आहे. त्यापाठोपाठ पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला कृष्णा खोरे विकास महामंडळाने गेल्या आठवड्यातच दिला आहे. त्यातच लोकसंख्या आणि तिच्यासाठी पाणी याबाबतचा सविस्तर अहवाल पाठविण्याची सूचना प्राधिकरणाने महापालिकेला केली. त्यानुसार सुमारे ५५ लाख लोकसंख्येला पुरेल इतका पाणीसाठा मागविण्याचा प्रस्ताव महापालिका तयारी करीत आहे. शहरासाठी ११५० एमएलडी पाणीसाठा देण्याचा निर्णय पाटबंधारे खात्याने दिला असला तरी, सध्या १३५० एमएलडी पाणीसाठा घेण्यात येत आहे. त्यानुसार संपूर्ण शहराला पुरेसे पाणी देण्यात येत असून, आणखी पाणीकपातीच्या हालचाली नाहीत. मात्र, पालकमंत्री गिरीश बापट हे महापौरांसह अन्य पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करणार आहेत. पुढील आठवड्यात बैठक होऊन चर्चा करण्यात येणार आहे. 

पाणीकपातीचा निर्णय झालेला नाही. मात्र, पालकमंत्री, महापालिकेतील पदाधिकारी आणि प्रशासनाची बैठक होईल. त्या बैठकीत चर्चा होईल.
- व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा प्रमुख, पुणे महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com