सनियंत्रण समितीच्या बैठकीत वाघोलीबाबत 'या' विषयावर झाली चर्चा

coronaa1.jpg
coronaa1.jpg

वाघोली (पुणे) : वाघोलीत आज सनियंत्रण समितीची बैठक झाली. रुग्ण वाढ नियंत्रण करण्यासाठी 9 ते 5 ही वेळ न पाळणाऱ्यांवर दुकानदारांवर कारवाई करावी. भाजी विक्री आठवड्यातून दोन दिवसच करावी. 10 दिवस लॉक डाऊन करण्यासाठी जिल्हाधिकारी याना पत्र द्यावे. अशी चर्चा झाली. वाघोलीत 45 बाधित असून अॅक्टिव्ह 23 रुग्ण आहेत. तर 22 जण बरे झाले आहेत. गुरुवारपासून रविवारपर्यंत चार दिवसात 16 रुग्णांची भर पडली. या मुळे आता वाघोलीत पुन्हा पूर्ण लॉकडाऊन होणार अशी चर्चा सुरू झाली होती. आज झालेल्या बैठकीत याच विषयावर चर्चा झाली.

याबाबत सरपंच वसुंधरा उबाळे म्हणाल्या, वाघोलीत रुग्ण वाढले आहेत. त्यावर नियंत्रण करण्यासाठी समितीची बैठक घेतली. नागरिक भाजीपाला खरेदीचा बहाणा करून दररोज बाहेर पडत असल्याने भाजीपाला विक्री आठवड्यातून दोनदा म्हणजे मंगळवार व शुक्रवारी करावी अशा सूचना आल्या. दुकानांची वेळ 9 ते 5 राहावी यासाठी वॉर्डनिहाय टीम तयार करून त्यांनी वॉर्डातील दुकानावर लक्ष ठेवावे. यामध्ये ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस मित्र व ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश असणार आहे. मास्क न वापऱ्यांवर सक्त कारवाई करावी. जे ड्युटीसाठी शहरात जातात त्यांनी ग्रामपंचायतीकडे माहिती द्यावी.

दहा दिवस लॉकडाऊन लागू करावा अशी अनेकांची सूचना होती. मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ती परवानगी आल्यानंतर ती लागू होईल. याबाबत उद्या पत्र देणार आहे. सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेण्यात येईल. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येकाचा सहभाग महत्वाचा आहे. मास्क वापरण्याची स्वयंशित प्रत्येकाने लावली पाहिजे. विनाकारण फिरणे टाळले पाहिजे. दररोज भाजीपाला खरेदी साठी बाहेर पडण्यापेक्षा तीन चार दिवसाचा भाजीपाला एकदाच खरेदी केल्यास गर्दी होणार नाही. नागरिकांनी सहकार्य केल्यास कोणतीही सक्ती लावण्याची गरज पडणार नाही. या बैठकीसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, आरोग्य, महसूल व पोलिस विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आमचाही विचार करावा
कोरोनाचे रुग्ण वाढणार नाही ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. आता कुठे थोडे फार आर्थिक गणित सुरू झाले आहे. आम्हीही काळजी घेत आहोत. रुग्ण वाढले पण ते वाढू नये यासाठी काळजी तर घेतलीच पाहिजे. मात्र जनता कर्फ्यू लागू करताना व्यापाऱ्यांचाही विचार करावा. दुकान भाडे आणि खर्च चुकत नाही. आर्थिकचक्र असेच सुरू ठेवून अन्य उपाययोजना कराव्या आम्ही ग्रामपंचायतीच्या पाठीशी आहोत. अशी भावना अनेक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com