गाळप हंगामाचा मुहूर्त आज ठरणार; राज्यपालांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

sugarcane.jpg
sugarcane.jpg

पुणे : यंदाचा गाळप हंगाम कधी सुरू करणार, याबाबत अखेर मंत्री समितीची बैठक मंगळवारी आज (ता. 19) होणार आहे. साखर आयुक्‍तालयाने गाळप हंगाम 25 डिसेंबरला सुरू करण्याबाबत प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविला आहे. त्यामुळे यादिवशी राज्यातील गाळप हंगामाला सुरवात होईल, अशी शक्‍यता आहे.

राज्यात दरवर्षी गाळप हंगाम सुरू करण्याबाबत तसेच तयारीचा आढावा घेण्यासाठी साधारण ऑक्‍टोबर महिन्यात मंत्री समितीची बैठक होते. परंतु राज्यात नवीन सरकार अस्तित्वात न आल्यामुळे ही बैठक रखडली होती. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट असल्यामुळे ही बैठक राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीला साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्यासह सहकार खात्याचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती साखर आयुक्‍तालयाकडून देण्यात आली.

''राज्यात यंदाच्या गाळप हंगामासाठी 105 साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात आला आहे. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतवर्षीच्या हंगामातील एफआरपीची सुमारे 95 टक्‍के रक्‍कम दिली आहे.''
- शेखर गायकवाड, साखर आयुक्‍त 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com