नगरपालिकेची आता होणार महिन्यातून एक सभा

मिलिंद संगई
शनिवार, 28 एप्रिल 2018

बारामती (पुणे) : शासनाच्या निर्देशानुसार आता एक महिन्यात नगरपालिकेची सभा घ्यावी लागणार असल्याने अनेक विषय वेगाने मार्गी लागतील अशी चिन्हे आहेत. 

नगरपालिकेच्या दोन सभातील अंतर एक महिन्यांपेक्षा जास्त असू नये असे बंधन राज्य शासनाने घातल्याने राज्यातील सर्वच नगरपालिकातून आता दर महिन्यात सभा होणार आहेत. केवळ सभा घेऊन चालणार नाही तर त्या सभेत झालेल्या निर्णयांचे इतिवृत्त सभा झाल्यानंतर सात दिवसात नागरिकांच्या माहितीसाठी संबंधित नगरपालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. 

नगरपालिकांच्या सभेतून होणाऱ्या शहरासंबंधीच्या निर्णयाची माहिती त्या शहरातील नागरिकांना व्हावी व कारभारात पारदर्शकता यावी तसेच इतिवृत्तात कोणतेही बदल करता येऊ नयेत या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतला आहे. 
बारामती नगरपालिकेची पूर्वीची सभा 2 एप्रिल रोजी झाली होती, त्या मुळे आता येत्या बुधवारी (ता. 2) सभा होणार आहे. 

एक महिन्याच्या कालावधीत सभा घेण्याचे बंधनच आता आल्याने एकाच सभेत मोठ्या संख्येने विषय देण्याची गरज पडणार नाही, मर्यादीत विषयांवर सांगोपांग चर्चा होऊन त्यावर निर्णय घेणे शक्य होणार असल्याने बहुसंख्य नगरसेवकांनीही या निर्णयाचे स्वागतच केले आहे. 

Web Title: meeting in once in month of nagarpalika