मध्य रेल्वेवर येत्या रविवारी नऊ तासांचा विशेष ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016

पुणे - मध्य रेल्वेवर रविवारी (ता. 23) नऊ तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान सीएसटी- कल्याण नवीन जलद मार्गाचं काम केलं जाणार असल्याने, मध्य मार्गावरील लोकलसह अनेक एक्‍स्प्रेस रद्द केल्या आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेसही रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, दिवा स्थानकात लोकल मार्गाच्या कट- कनेक्‍शन कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या कामामुळे सीएसटी ते कल्याण नवीन जलद मार्ग उपलब्ध होणार आहे. या मेगा ब्लॉकचा लोकल सेवांवर परिणाम होणार असल्याने सिंहगड, प्रगती, गोदावरी, राजकन्या या चारही गाड्या रद्द (अप ऍण्ड डाऊन) करण्यात आल्या आहेत. लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी, इतर लोकल गाड्यांना विशिष्ट ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. या मेगा ब्लॉकमुळे सिंहगड आणि प्रगती एक्‍स्प्रेस रद्द केली आहे. आवश्‍यकता नसल्यास प्रवास टाळावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Web Title: mega block to central railway