ऐन दिवाळीत मेगा ब्लॉक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पुणे-मुंबई मेगा ब्लॉक एक नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

पिंपरी - रविवार आणि शाळांना जोडून सुटी आल्याने दिवाळीसाठी रेल्वे प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी गर्दी वाढली आहे. काहींनी लांबच्या पल्ल्याचे आगाऊ आरक्षण केले आहे. पुणे-मुंबई मेगा ब्लॉक एक नोव्हेंबरपर्यंत वाढविल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

मध्य रेल्वे प्रशासनाने मंकी हिल ते कर्जत दरम्यान ५ ते १४ ऑक्‍टोबरपर्यंत मेगा ब्लॉक सांगितला होता. त्यामुळे पुणे- मुंबई मार्गावरील काही एक्‍स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या. काही गाड्यांचे मार्ग बदलले. त्यात प्रगती एक्‍स्प्रेस रद्द तसेच नांदेड- पनवेल एक्‍स्प्रेस गाडी पुण्यापर्यंतच चालविण्यात येत आहे. दिवाळीच्या सुटीत सहकुटुंब गावी जाण्यासाठी १२० दिवस आधी आरक्षण केले आहेत, त्या प्रवाशांना गाड्या रद्द केल्याने त्रास झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mega Block in the Diwali