खा. आढळराव पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त धामणीत महाआरोग्य शिबीर 

सुदाम बिडकर
शुक्रवार, 4 मे 2018

पारगाव (पुणे) : धामणी (ता. आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. 10) रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती शिवसेना उपजिल्हाप्रमुख व पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांनी दिली.

डी.वाय. पाटील रुग्णालय (पिंपरी) व डॉ. प्रमोद कुबडे यांचे स्टार हॉस्पीटल यांच्या वतीने सर्वरोग तपासणी व निदान शिबिराचे मोफत आयोजन केले आहे. आवश्यक रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन डायनालॉग इंडीयाचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील व शिवसेना जिल्हा प्रमुख राम गावडे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार विठ्ठल जाधव राहणार आहेत. याप्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख अविनाश रहाणे, तालुकाप्रमुख सुनिल बाणखेले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, जागर संघटनेचे अध्यक्ष सुरेश भोर, डॉ. सुभाष पोकळे, लक्ष्मणराव काचोळे, शिवाजीराव ढोबळे, सचिन बांगर, मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे, खडकवाडीचे सरपंच अनिल डोके, देविदास दरेकर, शिवाजी राजगुरु आदि उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात मागासवर्गीय नागरिकांना 14 व्या वित्त आयोगातुन पाण्याच्या प्लास्टिक जारचे मोफत वाटप करण्यात येणार आहे, उज्वला महीला गॅस योजनेअंतर्गंत लाभार्थी महीलांना गॅसजोड वाटप त्याच बरोबर आयुष्यमान भारत विमा योजनेअंतर्गंत नागरिकांचे अर्ज स्विकारण्यात येणार असल्याचे सरपंच सागर जाधव पाटील यांनी सांगितले.

Web Title: mega health campaign in dhamani on adhalrao patil birthday