पुणे महापालिकेत मेगाभरती

पुणे महापालिकेच्या सर्वच विभागात रिक्त पदे आहेत. त्यातही वर्ग तीन व वर्ग चारची सुमारे १० हजार पद रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट कामकाजावर होत आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Summary

पुणे महापालिकेच्या सर्वच विभागात रिक्त पदे आहेत. त्यातही वर्ग तीन व वर्ग चारची सुमारे १० हजार पद रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट कामकाजावर होत आहे.

पुणे - पुणे महापालिकेच्या (Pune Municipal) विविध विभागात अभियंत्याची पदे (Engineer Post) रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम (Efefct) होत असल्याने २०० कनिष्ठ अभियंत्याची पदे कायमस्वरूपी भरली जाणार आहेत. तर अग्निशमन दलातही २०० कंत्राटी कर्मचारी घेण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २९) प्रशासनाने (Administrative) घेतला आहे. आरोग्य विभागातील आणि प्रशासन विभागातील पदांचीही भरती केली जाणार आहे.

पुणे महापालिकेच्या सर्वच विभागात रिक्त पदे आहेत. त्यातही वर्ग तीन व वर्ग चारची सुमारे १० हजार पद रिक्त असल्याने त्याचा परिणाम थेट कामकाजावर होत आहे. राज्य सरकारने महापालिकेला पदभरती करण्यास परवानगी दिलेली असून, सध्या सर्व विभागांकडून रिक्त जागांचा आढावा घेतला जात आहे. पण महापालिकेच्या बहुतांश विभागात कनिष्ठ अभियंता आवश्‍यक आहे, पण या पदावरील कर्मचारी नसल्याने एकाच कनिष्ठ अभियंत्यावर ताण येत आहे. तसेच आरोग्य विभागातील डॉक्टरांसह इतर अनेक पद रिक्त असल्याने महापालिकेच्या रुग्णालयावर परिणाम होत आहे. अग्निशमन दलानेही २०० कर्मचारी भरण्याचा प्रस्ताव महापालिकेला दिला आहे.

अशी आहे स्थिती...

  • पुणे महापालिकेतील सध्या ३४८ कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त

  • त्यापैकी २०० पदे मे महिन्यात भरली जाणार

  • प्रशासनातील पदे रिक्त असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम

  • आरोग्य विभागात डॉक्टर, नर्ससह इतर पदांवर काम करण्यासाठी कर्मचारी नाहीत

  • या जागा कायमस्वरूपी भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू

  • या पदांची संख्या किती असेल, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही

कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असल्याने २०० जणांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे. याची प्रक्रिया मे महिन्यात सुरू होईल. या पदभरतीसाठी निकष व इतर नियम अद्याप निश्‍चित झालेले नाहीत, तसेच प्रशासनातील व आरोग्य विभागाच्या जागाही भरल्या जाणार आहेत. उपनगरांमध्ये महापालिकेने अग्निशमन केंद्र सुरू केली आहेत, पण तेथे कर्मचारी नसल्याने २०० जणांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती केली जाईल.

- विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com