प्रीती सेठी, श्‍वेता चव्हाण, मानसी मोहटकर विजेत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’ने आयोजित केलेल्या मेंदी स्पर्धेत प्रीती धर्मेंद्र सेठी (नांदगाव, जि. नाशिक) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्‍वेता प्रीतम चव्हाण (पुणे) यांनी द्वितीय, तर मानसी मोहटकर (रहाटणी, पुणे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रतिमा दुरुगकर व धनश्री हेंद्रे यांनी काम पाहिले. 

पुणे - ‘सकाळ साप्ताहिक’ने आयोजित केलेल्या मेंदी स्पर्धेत प्रीती धर्मेंद्र सेठी (नांदगाव, जि. नाशिक) यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्‍वेता प्रीतम चव्हाण (पुणे) यांनी द्वितीय, तर मानसी मोहटकर (रहाटणी, पुणे) यांनी तृतीय क्रमांक मिळवला आहे. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रतिमा दुरुगकर व धनश्री हेंद्रे यांनी काम पाहिले. 

‘स्वामिनी-साड्यांची महाराणी’ कुमठेकर रोड, पुणे यांच्यातर्फे प्रथम क्रमांकास खास ‘स्वामिनी मस्तानी पैठणी’, द्वितीय क्रमांकास खास ‘स्वामिनी ऐश्‍वर्यवती साडी’ व तृतीय क्रमांकास खास ‘स्वामिनी भाग्यलक्ष्मी साडी’ देण्यात येणार आहे, तर पी. एन. गाडगीळ (निसर्ग हॉटेल लेन) पुणे यांच्यातर्फे प्रथम क्रमांकास तीन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, द्वितीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर, तृतीय क्रमांकास एक हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहे. उत्तेजनार्थ पुरस्कार मिळालेल्या सर्वांना ‘स्वामिनी-साड्यांची महाराणी’ कुमठेकर रोड, पुणे व पी. एन. गाडगीळ (निसर्ग हॉटेल लेन) पुणे यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपयांची गिफ्ट व्हाउचर्स देण्यात येणार आहेत. पुरस्कारांसदर्भात विजेत्यांबरोबर लवकरच संपर्क साधण्यात येईल. 

स्पर्धेत निकिता संतोषकुमार शहा (बारामती), शेजल रामेश्‍वर साबळे (पुणे), शुभांगी एकनाथ फापाळे (पुणे), वृषाली नरेश पवार (पुणे), गीतांजली मुकेश अनेचा (पुणे), पूनम गेनू थिटे (पुणे), निशा प्रमोद गायकवाड (पुणे), श्रद्धा सुयोग गुंदेचा (पुणे), सपना अभिजित कासवा (राजगुरुनगर), उषा पवन गौड (पुणे) यांची डिझाइन्स उत्तेजनार्थ ठरली. 

विजेत्यांसह उल्लेखनीय डिझाइन्स असलेला ‘सकाळ साप्ताहिक’चा अंक शनिवारी (ता. ११) प्रसिद्ध होत आहे. अंकामध्ये उत्तेजनार्थ, संकल्पना मेंदी (थीम बेस्ड), बाल विभाग, उल्लेखनीय असे विभाग करण्यात आले आहेत.

स्पर्धेत पुरुषांचाही सहभाग
‘सकाळ साप्ताहिक’कडून मेंदी स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. महिलांच्या बरोबरीनेच पुरुषांनीही मेंदी स्पर्धेत सहभाग नोंदवला. मुलींनी ‘मुली वाचवा, निसर्ग वाचवा’ असे संदेश देणारी डिझाइन्स स्पर्धेसाठी पाठवली. पाचवीतील विद्यार्थिनीपासून ८० वर्षांच्या आजींनीही स्पर्धेत सहभाग नोंदवला. 

Web Title: Mehandi Competition Result