खा. सुप्रिया सुळेंचा आंदोलनकर्त्या शेतकरी व महिलांना धीर

राजकुमार थोरात
सोमवार, 26 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येेेथे नीरा नदीमध्ये पात्रामध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणातील सहा शेतकऱ्यांची प्रकृती चितांजनक झाली अाहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी  उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी व महिलांशी दूरध्वनीवरुन संवाद साधून त्यांना धीर देऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे सांगितले.

वालचंदनगर (पुणे) : निरवांगी (ता.इंदापूर) येेेथे नीरा नदीमध्ये पात्रामध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या बेमुदत उपोषणातील सहा शेतकऱ्यांची प्रकृती चितांजनक झाली अाहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी  उपोषणकर्त्या शेतकऱ्यांशी व महिलांशी दूरध्वनीवरुन संवाद साधून त्यांना धीर देऊन आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे सांगितले.

नीरा नदीवरील बंधारे कोरडे पडल्याने नदीकाठच्या इंदापूर, माळशिरस व फलटण तालुक्यातील २८ गावात पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून शेतकऱ्यांचे कोरड्या नदीत बेमुदत उपोषण सुरु आहे. नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी रास्ता रोको, काळ्या गुड्या उभारुन, मुंडन करुन शासनाचा निषेध केला. आज उपोषणाचा पाचवा दिवस होता.

उपोषणासाठी १६ शेतकरी बसले असून यातील श्रीरंग यशवंत रासकर (वय ६५), चंद्रकांत साहेबराव फडतरे (वय ६७), वैभव अरुण जाधव (वय २१), या तीन शेतकऱ्यांची प्रकृती चितांजनक झाल्याने त्यांना इंदापूर उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी अजिनाथ कांबळे (वय ७९) व शंकर होळ (वय ७२) या दोन शेतकऱ्यांना इंदापूर उपजिल्हारुग्णालय व किरण बोरा (वय ५५) या शेतकऱ्याला बारामतीमध्ये दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले असून सहा शेतकऱ्यांची प्रकृती चितांजनक झाली आहे.  

पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी आज सोमवार (ता.२६) रोजी खासदार सुप्रिया सुळेशी  दुरध्वनीवरुन उपोषणकर्ते शेतकरी व महिलांशी संपर्क साधून दिल्यानंतर महिलांनी धरणामध्ये पाणी असून ही भाजप सरकार पिण्याचे पाणी देत नाही. गावामध्ये  पिण्याचे पाणी मिळत नाही, जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून आम्ही दिवसभर कोरड्या नदीमध्ये बसून असल्याचे सांगितले. ताई तुम्हीच आमच्या पाण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,  मुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार भरणे यांच्याशी बोलणे झाले असून उद्या मंगळवार (ता. २७) रोजी तातडीने मुंबईमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे.

आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगून उपोषणकर्ते शेतकरी व महिलांना धीर दिला. शासन पाणी सोडण्यासाठी तयार नसल्यामुळे आमदार भरणे ही आक्रमक झाले  असून आज मंगळवारी (ता.२६) सकाळी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचा बेमुद उपोषणाची माहिती देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेतेही राधाकृष्ण विखे-पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात स्थगन विषयात निरवांगीच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला.
 

Web Title: member of parliament supriya sule supports hunger strikers at walchandnagar