सत्तरा गावातील प्रतिनिधांचा 'माणदेशी' आभ्यास दौरा

विजय मोरे
गुरुवार, 7 जून 2018

उंडवडी -  यंदा 'पानी फाउंडेशन' उपक्रमात सहभाग घेवून जलसंधारणाची कामे केलेल्या बारामती, इंदापूर व पुरंदर या तीन तालुक्यातील सत्तरा गावातील प्रतिनिधींचा बारामती येथील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील गावांना भेट व जलसंधारणाच्या कामांचा आभ्यास दौरा नुकताच करण्यात आला. 

यावेळी या आभ्यास दौऱ्यात संबंधित गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रतिनिधी तसेच अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार व बारामती पंचायत समितीचे माजी सभापती पोपटराव पानसरे यांचा समावेश होता.  

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील भांडवली व वाघमोडेवाडी या गावांनी यंदा 'पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप' स्पर्धेत भाग घेवून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार व गुणवत्तापूर्ण मृद व  जलसंधारणाची विविध कामे करण्यात आली आहेत. 
यामध्ये 'पानी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत माथा ते पायथा या तत्वानुसार विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. 

यामध्ये खोल सलग समतल चर, कंटूर बांध, बांधबंधिस्ती, शेततळे, गॅबियन बंधारे, अनदगडी बांध, ओढा खोलीकरण, माती नाला बांध आदी मृद व जलसंधारणाच्या कामांचा समावेश आहे. या कामाची  दौऱ्यातील पदाधिकारी व प्रतिनिधीनी केली. 

या आभ्यास दौऱ्यात बारामती तालुक्यातील जळगाव सुपे, सोनवडी सुपे, उंडवडी सुपे, निंबोडी, सावंतवाड़ी, अंजनगाव, सावंतवाडी तर इंदापूर तालुक्यातील थोरातवाड़ी, कचरवाडी तसेच पुरंदर तालुक्यातील मांढर, वाघापुर, बेलसर, उदाचीवाडी, थोपटेवाडी, तक्रारवाड़ी, पिंपरे, शिवतक्रारवाडी या गावांतील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

या आभ्यास दौऱ्यात 'पानी फाउंडेशनचे' माण तालुक्यातील समन्वयक अजित पवार यांच्यासह  कार्यकर्त्यांनी जलसंधारणाच्या कामाची प्रतिनिधीना सविस्तर माहिती दिली. तसेच गाव दुष्काळ मुक्त व पाणीदार करण्यासाठी सेवानिवृत्त विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार व सुनंदा पवार यांनी आभ्यास दौऱ्यातील लोकांना मार्गदर्शन केले. 

Web Title: mendeshi study of Sattara village representatives visited