रजोनिवृत्ती’चे स्वागत करा

संदीप जगदाळे 
शुक्रवार, 13 जुलै 2018

‘रजोनिवृत्ती’ हा आजार नव्हे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील या टप्प्याला सामोरे जावेच लागते. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात मुली मनाची जी घालमेल अनुभवतात, तीच घालमेल आणि अस्वस्थता मेनोपॉजच्या काळातही स्त्रियांना सतावते. मात्र हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे.

हडपसर : मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा आजार नाही. निसर्गचक्राचाच हा एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला महिलांनी सकारात्मक भावनेने स्वीकारणे आवश्यक आहे. ‘रजोनिवृत्ती’चे टेन्शन न घेता तिचे स्वागत करा. ‘रजोनिवृत्ती’ हा आजार नव्हे. प्रत्येक स्त्रीला आयुष्यातील या टप्प्याला सामोरे जावेच लागते. मासिक पाळी सुरू होण्याच्या वयात मुली मनाची जी घालमेल अनुभवतात, तीच घालमेल आणि अस्वस्थता मेनोपॉजच्या काळातही स्त्रियांना सतावते. मात्र हा निसर्गचक्राचाच एक भाग आहे. जीवनातल्या या पर्वाला सकारात्मक दृष्टीकोनाने स्वीकारणे आवश्यक आहे, असे मत 'रिसर्च इन्स्टीटयुट ऑफ हेल्प सायन्स अॅण्ड मॅनेजमेंन्ट' च्या समन्वयक डॅा. अनघा कोठाडीया यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले महिला विकास ज्ञान प्रतिष्ठाण व माय पुणे असोसिएशन, हडपसर यांच्या संयुक्त विदयमानाने शुक्रवारी (ता. १३) चाळीशी नंतर महिलांमध्ये होणारे बदल, आजार व त्यावरील उपायोयजना या विषयावर आयोजित कार्यशाळेत डॅा. अनघा कोठाडीया बोलत होत्या. 

याप्रसंगी माय पुणे असोसिएशनचे अध्यक्ष डॅा. संजय नाईक, डॅा. संजय सांवत, सावित्रीबाई फुले महिला विकास ज्ञान प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामचंद्र कुंभार, पुणे अंधशाळेचे प्रशाककिय अधिकारी कृष्णा शेवाळे, डॅा. दिपक शिरसाठ अंगणवाडी सेविका सुजाता लोंढे, सुरेखा भोसले, नम्रता कांबळे व दोनशे महिला उपस्थित होत्या. 

यावेळी डॅा. संजय नाईक म्हणाले, ''मेनोपॉज म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४5ते ५० व्या वर्षी स्त्रीला मेनोपॉज येऊ शकतो. अशा वेळी जर एखाद्या स्त्रीला एक वर्षांपर्यंत मासिक पाळी आलीच नाही तर तिला मेनोपॉज आला असे म्हणता येते. तरीही या स्त्रियांनी पाळी चुकल्याची शंका आल्यावर स्त्रीरोग तज्ञांकडून तो मेनॉपॉजचाच टप्पा असल्याची शहानिशा करून घेणे आवश्यक आहे. पाळी बंद होण्याआधी काही वर्षे आधीपासूनच स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला ‘पेरीमेनोपॉजल पिरीयड’ म्हणतात. हा काळ साधारणपणे ३ ते ४ वर्षांचा असू शकतो.''

Web Title: menopause is natural says Dr Anagha Kothadia