Video : ...अन् 76 वर्षाचे आजोबा चढले 40 फुट उंच खांबावर!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

सदर व्यक्तीची प्रेमाने समजूत काढत त्यांना सुरक्षित बांधून सुखरूप खाली उतरविण्यात आले.

पुणे : कोंढव्यातील लुल्लानगर येथील सिंध हिंदु सोसायटी परीसरातील बलवीर सिंग आनंद (वय 76) हे वयोवृद्ध आजोबा 40 फुट उंचीच्या एका लोखंडी खांबावर चढले होते आणि तेथून खाली उडी मारण्याच्या तयारीत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

याबाबत कोंढवा बुद्रुक आणि खुर्दच्या अग्निशमन दलास खबर मिळाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी पोलवर चढत जाऊन तसेच खालील बाजूस सेफ्टी नेटचे कव्हर ठेवत सदर व्यक्तीची प्रेमाने समजूत काढली. त्यानंतर त्यांना दोरीने गुंडाळून आणि सुरक्षित बांधून सुखरूप खाली उतरविले.

- डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळं त्या चिमुकल्याला मिळाला चेहरा!

त्यांच्या मुलाकडे याप्रकरणी अधिक माहिती विचारली असता त्यांनी सांगितले की, ते काही प्रमाणात मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. तसेच त्यांनी औषधे जास्त घेतली किंवा एखाद्या वेळेस घेतली नाहीत, तर त्यांच्याकडून असे अनुचित प्रकार घडत असतात.

- अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक 

सदरची कामगिरी केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जवान माने, खाडे, शिंदे, शेख, नाईकनवरे आणि देवदूतच्या जवानांनी पार पाडली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mentally disabled 76 year old grandfather climbed to 40 foot pole in Kondhawa Pune