पुणे : पॅरोलवर सुटलेल्या आरोपीकडून मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त

कोंढवा पोलिसांनी उंड्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोघांच्या मुसक्या आवळल्या
मेफेड्रॉन
मेफेड्रॉन sakal

उंड्री : येरवडा कारागृहातून(yerwada jail) दुहेरी खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर(parol) बाहेर आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांना कोंढवा पोलिसांनी (kondhwa police)अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 74 हजार 920 रुपये किंमतीचे मेफेड्रॉन(Mephedrone) हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. ही कारवाई कोंढवा पोलिसांनी एन.आय.बी.एम कडून उंड्रीच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर मंगळवारी (दि.21) केली आहे.शाबीर शमशुद्दीन शेख (वय-45 रा.मिलींद पार्क, कोंढवा खुर्द) आणि शाहरुख समशेर शेख (वय-29 रा. जनवाडी मशीद मागे, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोंढवा पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी उंड्रीच्या दिशेने जाणाऱ्या वनविभागाच्या जागेच्या समोर दोन व्यक्ती संशयित आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे विक्रीसाठी आणलेले 74 हजार 920 रुपये किमतीचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला. तसेच 1220 रुपयांची रोख रक्कम मिळाली. पोलिसांनी दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस नाईक जोतीबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, सतिश चव्हाण लक्ष्मण होळकर, पोलीस शिपाई किशोर वळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान मचाले करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com