esakal | व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून मर्सिडीज कार नावावर करून घेतली
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून मर्सिडीज कार नावावर करून घेतली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : दरमहा चार टक्के व्याजाने दिलेले २९ लाख रुपये परत न केल्याने जीवे मारण्याची धमकी, मर्सिडीज बेंझ कार नावावर करून घेत २९ लाख रुपयांच्या बदल्यात ३७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी औंध येथील नानासाहेब गायकवाड याची मुलगी दीपा गायकवाड हिचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला.

हेही वाचा: राज्यात यंदा विक्रमी ऊस गाळप होणार

आरोपींनी या प्रकरणातील फिर्यादी यांना अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नानासाहेब गायकवाड याने फिर्यादीच्या कानाजवळ तीन वेळा गोळीबार केला, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. या प्रकरणी नानासाहेब गायकवाड, दीपा गायकवाड यांच्यासह राजू दादा अंकुश आणि नानासाहेब गायकवाडच्या चालकावर चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश शिवाजी येवले (वय २७, रा. पिंपळे निलख) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

२०१७ ते मार्च २०२१ दरम्यान आरोपीच्या औंध येथील घरी व सूस येथील फार्म हाऊसवर हा प्रकार घडला. नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांना व्यवसायासाठी २०१७ मध्ये दरमहा ४ टक्के व्याजाने २९ लाख रुपये दिले होते. त्याबदल्यात फिर्यादी दरमहा १ लाख ३६ हजार रुपये व्याज नानासाहेब गायकवाडकडे देत होते. मात्र व्याजाच्या मुद्दलाच्या सिक्युरिटीसाठी नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांची मर्सिडीज बेंझ कार ताब्यात घेतली.

हेही वाचा: अत्याचाराचे गुन्हे ‘वूमन अ‍ॅट्रॉसिटी’ म्हणून दाखल करून घ्यावेत : चित्रा वाघ

त्यानंतर नानासाहेब गायकवाडने फिर्यादी यांना त्याच्या घरी बोलावून गाडीच्या कागदपत्रांसाठी आवश्यक असणाऱ्या आरटीओच्या कोऱ्या टीटी अर्जावर व २५ लाख रुपयांच्या धनादेशावर सह्या करून घेतल्या आणि ती गाडी दीपा गायकवाडच्या नावावर करून घेतली, असे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी दीपा गायकवाडने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी त्यास विरोध केला.

loading image
go to top