'रुपी' बँकेचे होणार विलीनीकरण?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

- रूपी सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठविला

पुणे : रूपी सहकारी बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेकडे विलीनीकरणाचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु त्यावर राज्य सहकारी बॅंकेकडून प्रतिसाद आलेला नाही. या प्रस्तावाबाबत रिझर्व्ह बॅंकेला माहिती व्हावी, यासाठी हा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेकडेही पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती रूपी बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित यांनी दिली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

रूपी बँकेच्या ठेवीदारांचे नुकसान होणार नाही. तसेच, राज्य सहकारी बँकेवरच्या आर्थिक स्थितीवरही बोजा पडणार नाही, अशा स्वरुपाचा विलिनीकरणाचा प्रस्ताव रूपी बँकेने राज्य सहकारी बॅंकेला पाठविला आहे. रुपी बॅंकेच्या विलिनीकरणाच्या दृष्टीने राज्य सहकारी बॅंकेने विशेष तपासणी पूर्ण केली आहे. हा तपासणी अहवाल राज्य सहकारी बॅंकेच्या विचाराधीन आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर थरारक अपघात; चौघे जागीच ठार

रिझर्व्ह बॅंकेने सुचविल्यानुसार रुपी बँक आणि राज्य सहकारी बॅंकेने परस्पर सहमतीने तयार केलेला प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेला सादर होणे आवश्‍यक आहे. त्यानुसार हा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेला पाठविण्यात येणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Merge Proposal of Rupee Bank will send to RBI