`#MeToo’ मोहिमेला बदनाम करू नका - सरोदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

पुणे - #MeToo या मोहिमेमुळे पुरुषसत्तेने दडपणूक केलेल्या व अनेक समस्यांना सामोरे जाणाऱ्या महिलांना आता किमान बोलण्याची संधी मिळू लागली आहे. या मोहिमेच्या गैरवापराच्या नगण्य उदाहरणांमुळे या मोहिमेला बदनाम करू नये, असे आवाहन ॲड. रमा सरोदे यांनी केले.

केवळ सोशल मीडियातून या विषयांवर बोलणाऱ्या महिलांवर टीका होत आहे. मात्र, कायदेशीर कारवाईसाठी संबंधित महिलांना योग्य ती मदत का नाही मिळाली, याचा विचार केला जावा, असेही त्यांनी नमूद केले. 

 ‘#MeToo आणि कायदा’ या विषयावरील चर्चासत्रात सरोदे बोलत होत्या. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्यावतीने या चर्चासत्राचे आयोजन केले होते. 

भारतात महिलांबाबतीत कायदे वा कायद्यातील सुधारणा बहुतांशवेळा एखादी घटना- गुन्हा घडल्यानंतर, त्याला प्रतिसाद म्हणून बनवले गेले आहेत. दूरदृष्टीने महिलांच्या सुरक्षेबाबत काही घडण्याआधी विचार केला जात नाही, हे दुर्दैव आहे, असेही सरोदे यांनी नमूद केले. 

ॲड. असीम सरोदे यांनी या मोहिमेच्या काही मर्यादा व न्यायालयीन प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. लेखक किरण यज्ञोपवित यांनी सर्वांनीच या मोहिमेला साथ देऊन स्त्री- पुरुष सर्वांसाठीच निकोप वातावरण तयार करण्याची गरज व्यक्त केली. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी याबाबत हॉलिवूड, बॉलिवूडमध्ये लैंगिक अत्याचारांचे आरोप झालेल्या व्यक्तींसोबत काम न करण्याचे ठराव अनेकांनी मंजूर केले, तसे मराठीत करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अभिनेत्री विभावरी देशपांडे, पौर्णिमा मनोहर, लेखक राज काझी, रमेश परदेशी यांनीही चर्चासत्रात आपले विचार मांडले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी चर्चासत्र आयोजनात पुढाकार घेतला होता.

Web Title: MeToo Campaign Infamous Rama Sarode