पोलिस खात्यामध्ये #MeToo

पांडुरंग सरोदे
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून सतत ‘ड्यूटी’ फिरती ठेवली जाते, मग गुन्ह्यांचा तपास कसा आणि केव्हा करायचा?  तरीही ‘कसुरी रिपोर्ट’ काढला जातो. कधी सुट्टी नाकारली जाते, तर कधी सुट्टी दिल्यानंतर ‘वैयक्तिक’ आयुष्याची माहिती काढली जाते. त्याहीपेक्षा अपमान करणे, अश्‍लील भाषेत बोलणे, कुठल्या शिस्तीचा भाग आहे? असे अनेक प्रश्‍न उपस्थित करीत काही महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाबद्दल आपले गाऱ्हाणे मांडले. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे आता पोलिस खात्यामध्येही ‘मी टू’ चळवळ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

दिवसेंदिवस वाढणारा कामाचा ताण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याची तारेवरची कसरत पोलिसांना करावी लागते. अशा वेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची किंवा त्यांच्या अडचणी समजून घेत मानसिक आधार देण्याची गरज असते. त्यादृष्टीने काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे त्यांच्या कर्मचाऱ्यांशी निर्माण झालेले चांगले नाते अधिकाऱ्यांची बदली किंवा निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होणाऱ्या भावनांमधून दिसते. काही ठराविक पोलिस ठाण्यात मात्र याउलट परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे.

पोलिस कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या असतात. गांभीर्य असलेल्या प्रश्‍नांची नक्कीच दखल घेतली जाते. त्यादृष्टीने पोलिस अधिकाऱ्यांच्या वागणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यामध्ये ‘भावनिक प्रज्ञावंत’सारखे विशेष वर्गासह विविध उपक्रम राबविले जातात. 
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे

आम्हाला दिलेले काम पूर्ण केल्यानंतरही वेगवेगळी कारणे शोधून वरिष्ठ अधिकारी मानसिक त्रास देतात. अपमानास्पद वागणुकीसह अश्‍लील भाषेचादेखील ते वापर करतात. यासंबंधी वरिष्ठांकडे तक्रार केली. मात्र, अद्याप दखल घेण्यात आली नाही.
- एक महिला पोलिस कर्मचारी.

असा दिला जातो मानसिक त्रास!
वरिष्ठ पोलिस अधिकारी व त्यांच्या ‘खास’ लोकांकडून पोलिस कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जातो. त्यामध्ये कामाबाबत दुजाभाव, अश्‍लील भाषेचा वापर, असभ्य वर्तन, शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात नाक खुपसणे, सुटी देण्यास टाळाटाळ,  महिला कर्मचाऱ्यांना ‘सीआर मोबाईल’ वाहनाची ड्यूटी देऊन त्यांची कुचंबणा करण्यासारखे प्रकार घडत असल्याची कैफियत महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी मांडली.

Web Title: MeToo in Police Department Crime