Pune | मेट्रोपर्यंत जाण्यासाठीच्या सायकलींचे पुण्यात आगमन

metro bicycles to go pune arrival
metro bicycles to go pune arrivalsakal

पुणे : मेट्रोच्या प्रवाशांना घरापासून स्थानकापर्यंत पोचण्यासाठी महामेट्रोने (Maha metro) मायबाईकच्या माध्यमातून भाडेतत्त्वावर सायकली उपलब्ध करून दिल्या असून त्या शहरात पोचल्या आहेत. मेट्रोच्या उदघाटनाच्या दिवसापासून त्या पुणेकरांना(Pune) उपलब्ध होणार आहेत.

वनाज- रामवाडी मार्गावर पहिल्या टप्प्यात मेट्रो वनाज, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, नळस्टॉप आणि गरवारे कॉलेज दरम्यान धावणार आहे. तसेच पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या मार्गावर मेट्रो कार्यान्वित होणार आहे.

metro bicycles to go pune arrival
अत्यंत दिलासादायक! मुंबईत दिवसभरात सात हजारपेक्षाही कमी रुग्ण

या सर्व स्थानकांवर प्रवाशांसाठी महामेट्रोने सायकली उपलब्ध करून दिल्या आहेत. दोन्ही शहरांतील ३१ मेट्रो स्थानकांवर या सायकली उपलब्ध होणार आहेत. मात्र, दोन्ही शहरांत मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यात उदघाटन होणाऱ्या मार्गांवरील स्थानकांवर प्रवाशांना या सायकली उपलब्ध होतील. त्यासाठीच्या सायकली पुण्यात पोचल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार सायकली उपलब्ध होणार आहेत.

अशी आहे योजना

प्रवाशांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत जाण्याठी मायबाईकतर्फे सायकली भाडेतत्त्वावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे महिन्यांचे भाडे ६०० ते ७०० रुपये असू शकेल. प्रवाशाने दरमहा तत्त्वावर ही सायकल घेतल्यास तो घरीही घेऊन जावू शकेल. घरापासून मेट्रो स्थानकावर पोचल्यावर तेथे सायकल स्टॅंडवर सोडायची. मेट्रोतून पुढे प्रवास करायचा. त्या स्थानकावर उतरल्यावर तेथील सायकल घ्यायची आणि पुढे प्रवाशाने इच्छितस्थळी जायचे, अशा प्रकारची ही योजना आहे.

metro bicycles to go pune arrival
गोव्यात महाविकास आघाडी नाहीच! राष्ट्रवादी-शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब

ॲपबेस्ड सिस्टीम

मायबाईकच्या ॲपवरून प्रवाशांना ही सायकल लॉक, अनलॉक्ड करता येईल. तसेच सायकलच्या भाड्याची रक्कमही ॲपवरून रिचार्ज करता येईल. त्यासाठी प्रवाशांना ॲपचा वापर करावा लागेल. या सायकलला जीपीएस सिस्टीम असेल. तसेच ॲपद्वारेच तिचा वापर करता येईल. सायकल भाडेतत्त्वावर न घेताही ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना या सायकलचा वापर करणे शक्य होणार आहे. मेट्रोच्या उदघाटनाच्या दिवसापासून या सायकली प्रवाशांना उपलब्ध होतील, अशी माहिती ‘माय बाईक’चे संचालक श्रेयांस शहा यांनी दिली.

मेट्रोच्या उदघाटनानंतरच सायकली

पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ जानेवारीला उदघाटन करण्याचा महापालिकेचा प्रयत्न होता. परंतु, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे उदघाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून तो आता फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होईल, अशी माहिती महापालिकेचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी दिली.

metro bicycles to go pune arrival
पुणे जिल्ह्यात ९० लाख नागरिक लसवंत

असे असेल सायकलींचे भाडे

  • दरमहा सुमारे ६०० रुपये

  • वन टाईम युज - किमान २० रुपये १० तासांसाठी

  • १० तासांपुढे प्रत्येक तासाला भाडे २ रूपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com