जमीन तपासणीचे काम बाद मशिनरीमुळे लांबणीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 डिसेंबर 2016

पिंपरी - मेट्रोच्या भूमिपूजनानंतर अवघ्या काही दिवसांत त्याच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असले, तरी दुसऱ्या बाजूला जमिनीची तपासणी करण्यासाठी मुंबईहून पाठवण्यात आलेली मशिनरी पूर्णपणे बाद झालेली असल्यामुळे अद्याप ते काम सुरू करणे शक्‍य झालेले नाही. दरम्यान, येत्या एक ते दोन दिवसांत नवीन मशिनरी दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.

पिंपरी ते कृषी महाविद्यालयापर्यंतचा मार्ग एलिव्हेटेड राहणार आहे. त्यामुळे जमिनीखाली 50 मीटरपर्यंत काय आहे, दगड कुठे आहेत याची तपासणी करण्याचे काम महामेट्रोकडून हाती घेण्यात आले आहे. मेट्रोच्या मार्गावर प्रत्येक ठिकाणी ही तपासणी करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष कामाला सुरवात होण्याआधी सर्वेक्षण आणि जमिनीची तपासणी करण्यात येणार आहे. भूमिपूजनानंतर लगेचच हे काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी बाद झालेली मशिनरी आल्याने ते सुरू होऊ शकलेले नाही. नवीन मशिनरी आल्यानंतर लवकरच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वल्लभनगरजवळील जमिनीची तपासणी करण्यात येणार आहे.

Web Title: Metro checking work delayed