मेट्रो ‘एफएसआय’ पुण्यापुरताच

मेट्रो ‘एफएसआय’ पुण्यापुरताच

पुणे - मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिघात वाढीव ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) देण्याबाबत निर्णय घेताना राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. मेट्रो स्टेशनचे नकाशे मंजूर करताना केवळ पुणे महापालिकेच्या हद्दीतील स्टेशनपुरताच वाढीव ‘एफएसआय’ देण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे.  पिंपरी-चिंचवड हद्दीतील स्टेशनबाबत या आदेशात मौन बाळगले आहे. 

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने मेट्रो स्टेशनच्या नकाशांना मंजुरी दिली. तसा आदेशही राज्य सरकारने काढला आहे. मात्र पुणे महापालिकेच्या हद्दीतील मेट्रो स्टेशनच्या परिसरासाठी हा आदेश लागू असल्याचे यात म्हटले आहे. दोन्ही महापालिकेच्या हद्दीत मेट्रोचे स्टेशन आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांना वाढीव एफएसआयचा लाभ मिळणार नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

नगर विकास विभागाकडून पुणे शहराबाबत निर्णय घेताना सातत्याने चुका होत आहेत. दोन्ही महापालिकांच्या हद्दीत समान निर्णय असणे अपेक्षित असताना केवळ पुणे शहरात वाढीव ‘एफएसआय’ देण्याचा निर्णय घेणे योग्य नाही.
- सुधीर कुलकर्णी, अध्यक्ष, नागरी हक्क संस्था 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com