मेट्रो निगडीपर्यंत नेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

पिंपरी - पिंपरीमध्ये सुरू असणाऱ्या मेट्रो मार्गाचा विस्तार करून निगडीपर्यंत नेण्याची मागणी नगरसेवक सचिन चिखले यांनी महामेट्रोकडे केली आहे. निगडीपर्यंतचे काम पहिल्या टप्प्यात करावे, असे निवेदनात म्हटले आहे. 

निगडीपर्यंत मेट्रो नेल्यास या भागातील प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या निगडीमधील भक्‍ती शक्‍ती चौक परिसरात अनेक विकास कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. काही दिवसांनी मेट्रोचे काम सुरू झाल्यास कोंडी कायम राहील. मेट्रोचे काम आत्ताच सुरू करावे.

दरम्यान, महामेट्रोने पिंपरी ते निगडीतील भक्‍ती शक्‍तीपर्यंत मेट्रो मार्ग नेण्याच्या मागणीवर काम सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यासंदर्भात मेट्रोला विनंती केली असून, त्यानुसार पिंपरी ते निगडी मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या काही दिवसांमध्ये हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम यांनी सांगितले.

Web Title: metro nigdi