मेट्रोचा नियोजित मार्ग निरुपयोगी - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

पिंपरी - ‘‘आम्ही विकासकामांसाठी ‘ई-टेंडरिंग’ची व्यवस्था केली. कमी दराने निविदा काढल्या; परंतु निवडणुका आल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करून आमची बदनामी केली जाते. 

शहरासाठी निगडीपासून कात्रजपर्यंत मेट्रो सेवा हवी. मात्र, नियोजित मेट्रो मार्गाचा शहराला फायदा होणार नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी नाराजी व्यक्त केली. पुढील पाच वर्षांसाठीचे ‘व्हीजन’ डोळ्यांसमोर ठेवून नव्या-जुन्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. शहरवासीयांच्या विश्‍वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.  

पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी विविध विकासकामांची भूमिपूजने आणि उद्‌घाटने पवार यांच्या हस्ते झाली. त्या वेळी ते बोलत होते. 

पवार म्हणाले, ‘‘गेली पाच वर्षे आमच्यावर शहरवासीयांनी विश्‍वास टाकला. त्याला पात्र राहून आम्ही नियोजनबद्ध विकास करण्याचा प्रयत्न केला. 
कोणालाही त्रास देण्यासाठी जाणीवपूर्वक आरक्षणे टाकत नाही; परंतु विकासकामे करताना जागेची आवश्‍यकता असते. आम्ही ‘ई-टेंडरिंग’ची व्यवस्था केली. नियोजित रकमेपेक्षा कमी दराने निविदा काढल्या. मात्र, निवडणुका आल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात. प्रत्येक विकासकामांसाठी करदात्यांचा पैसा योग्यरीतीने खर्च झाला पाहिजे. ’’ 

देशात नोटाबंदीमुळे विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही नवीन पाचशे रुपयांची नोट पाहिली नाही. परंतु, छाप खान्यामधून नवीन नोटांना पाय फुटले आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा उद्रेक होता कामा नये.
- अजित पवार

Web Title: Metro planned way useless