मेट्रोसाठी सत्तावीस जागांची मागणी

Metro
Metro

पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २७ ठिकाणची एकूण १७ हजार ३३१ चौरस मीटर जागेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. स्टेशन आणि पर्किंगसाठी या जागेची मागणी करण्यात आली असून, त्यात शिवाजीनगर आणि औंध परिसरातील जागांचा समावेश आहे.

पीएमआरडीएने या मेट्रो प्रकल्पाचे काम ‘टाटा-सिमेन्स’ या कंपनीला दिले आहे. या प्रकल्पाची लांबी २३ किलोमीटर आहे. यात एकूण २३ स्टेशन असणार असून, लवकरच या कामास सुरवात होणार आहे. सरकारने या प्रकल्पासाठी बालेवाडी येथील जागा देण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे. 

या ठिकाणी होणार स्टेशन - 
(मागणी केलेले जागेचे क्षेत्र) 

पुणे विद्यापीठ (२२.१९ चौ.मी.), टायग्रीस कॅम्प व पुणे ग्रामीण पोलिस (४३.८५ चौ.मी.),  टायग्रीस कॅम्प व पुणे ग्रामीण पोलिस (१५२.७६ चौ.मी.), टायग्रीस कॅम्प व पुणे ग्रामीण पोलिस (१०१५.५१ चौ.मी.), राजभवन (३१४.५० चौ.मी.), टायग्रीस कॅम्प व पोलिस (३१९.५९ चौ.मी.), टायग्रीस कॅम्प, ग्रामीण पोलिस (१२६७ चौ.मी.), टायग्रीस कॅम्प, ग्रामीण पोलिस (३१८० चौ.मी.), टायग्रीस कॅम्प व पुणे ग्रामीण पोलिस (१७४० चौ.मी.), आकाशवाणी आणि हवामान विभाग (३२६ चौ.मी.), आरबीआय (१८१ चौ.मी.), शिवाजीनगर न्यायालय पार्किंग (१८२ चौ.मी.), सेंट्रल बी रिसर्च व ट्रेनिंग सेंटर (२९० चौ.मी.), शासकीय तंत्रशिक्षण विभाग (३०५ चौ.मी.), पोलिस भरती मैदान (२०१ चौ.मी.), सीवोईपी होस्टेल (२९० चौ.मी.), कृषी विद्यापीठ (१०५ चौ.मी.), कृषी महाविद्यालय (५७२५ चौ.मी.).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com