मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

पुणे - संरक्षण विभागाच्या खडकी येथील जागेवर मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे - संरक्षण विभागाच्या खडकी येथील जागेवर मेट्रो मार्गाच्या कामाला परवानगी द्यावी, अशी मागणी खासदार अनिल शिरोळे यांनी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुण्यात पिंपरी-चिंचवड ते जिल्हा न्यायालय आणि वनाज ते जिल्हा न्यायालय अशा दोन मेट्रो मार्गांचे काम प्रगतिपथावर आहे. पिंपरी-चिंचवडच्या मार्ग संरक्षण विभागाच्या खडकी येथील जागेतून जात आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील हॅरिस पूल ते रेंजहिल्स डेपो हा सुमारे चार किलोमीटरच्या मार्गाचा यात समावेश आहे. या भागात काम करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्‍यक आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर या मार्गाचे काम तातडीने सुरू करता येणार असल्याचे या निवेदनात नमूद केले. यासंदर्भात केंद्रीय मंत्री आणि केंद्र सरकारच्या पायाभूत समितीचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून, त्यांनीही सकारात्मकता दाखविल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

Web Title: metro route work permission anil shirole