Video : #PuneMetro : मेट्रोच्या भुयारी मार्गाला गती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

असा आहे भुयारी मार्ग

  • रेंजहिल्स ते स्वारगेट - भुयारी मेट्रोचे अंतर - ५. ५ किलोमीटर
  • भुयारी मेट्रोसाठी स्थानके - शिवाजीनगर, बुधवार पेठ (कसबा पेठ), महात्मा फुले मंडई, स्वारगेट 
  • टनेल बोअरिंग मशिनद्वारे दोन बोगद्यांत रोज होत असलेली खोदाई - सरासरी १० मीटर

पुणे - पिंपरी- स्वारगेट मार्गावर भुयारी मेट्रोसाठी सुमारे २०० मीटर बोगदा तयार करण्याचा टप्पा मंगळवारी गाठण्यात आला. येत्या दोन महिन्यांत स्वारगेटकडूनही दोन टनेल बोअरिंग मशिनद्वारे (टीबीएम) बोगद्याची खोदाई होणार आहे. एकाच वेळी चार टीबीएम कार्यान्वित झाल्यावर भुयारी बोगद्याचे काम सुमारे दोन वर्षांत पूर्ण होईल, अशी अपेक्षा महामेट्रोने व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाजीनगरमधील कृषी महाविद्यालयाच्या मैदानातून सध्या भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्याचे काम सुरू आहे. तेथे सध्या दोन ‘टीबीएम’मार्फत स्वारगेटच्या दिशेने खोदाई सुरू आहे. त्यात २०० मीटर खोदाईचा टप्पा मंगळवारी गाठला. आता दोन ‘टीबीएम’ आल्यावर स्वारगेटहून शिवाजीनगरच्या दिशेने खोदाई सुरू होणार आहे. कृषी महाविद्यालयाच्या मैदानावरच रेंजहिल्स डेपोच्याही कामाने वेग घेतला आहे. पिंपरी- मार्गावरील मेट्रोच्या डब्यांची देखभाल दुरुस्ती रेंजहिल्स डेपोमध्ये होणार 
आहे, अशी माहिती महामेट्रोचे सहमहाव्यवस्थापक नितीन जोशी यांनी दिली. 

Image may contain: indoor

पुण्याची ओळख जुनीच चेहरा बदलतोय!

टाटा-गुलेरमार्ग या कंपनीच्या माध्यमातून भुयारी मेट्रोसाठी बोगदा खोदण्यात येत आहे. त्यासाठीचे टीबीएम मशिन हाँगकाँगवरून आणण्यात आले आहे. तसेच गुलेरमार्ग या तुर्कस्थानी कंपनीचे अभियंतेही पुण्यात आले असून, कामात सहभागी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी सुरुवात झालेल्या नव्या टीबीएम मशिननेही सुमारे ५ मीटरचा टप्पा पार केला आहे.

Image may contain: one or more people, screen and indoor

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भुयारी मेट्रोचे काम वेळापत्रकानुसार सुरू आहे. आणखी दोन ‘टीबीएम’ दोन महिन्यांत आल्यावर लगेच ती कार्यान्वित होतील. रोज सुमारे सरासरी १० मीटर बोगद्याची खोदाई होत आहे. एकाच वेळी चार मशिनमार्फत खोदाई सुरू झाल्यावर दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण होईल. 
- नितीन जोशी, सहमहाव्यवस्थापक- महामेट्रो

Image may contain: one or more people and outdoor

मेट्रो मार्ग 
  पिंपरी- स्वारगेट - सुमारे १६ किलोमीटर - ५. ५ किलोमीटर भुयारी, उर्वरित मार्ग एलिव्हेटेड 
  वनाज - रामवाडी - सुमारे १५ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड 
  हिंजवडी - शिवाजीनगर - १७ किलोमीटर - संपूर्ण एलिव्हेटेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Metro underground route work speed increase