पौड फाटा ते वारजे - शिवणे या मार्गावर मेट्रो धावणार

महेंद्र बडदे
मंगळवार, 31 जुलै 2018

पुणे : पौड फाटा ते वारजे - शिवणे या मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. हा मार्ग झाला तर वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता आदी भागातील नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

पुणे : पौड फाटा ते वारजे - शिवणे या मार्गावर मेट्रो सुरू करण्यासाठी प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली. हा मार्ग झाला तर वारजे, कर्वेनगर, कर्वे रस्ता आदी भागातील नागरीकांची वाहतुक कोंडीतून सुटका होण्यास मदत होईल.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी स्थायी समितीला हा प्रस्ताव सादर केला होता. वारजे, शिवणे, उत्तमनगर या भागात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. यामुळे कर्वे रस्त्यावर वाहतुकीचा ताण वाढत आहे. नदी पात्रातील रस्त्याचे काम रखडले आहे. या पार्श्‍वभुमीवर पौड फाटा ते वारजे - शिवणे या मार्गावर मेट्रो सुरू केली तर वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होईल.

वारजे भागात औद्योगिकीकरण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या झाल्या आहेत. भविष्याचा विचार करता या भागात मेट्रो सुरू करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या मार्गाचा महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेड करून डिपीआर करून घ्यावा. या अहवालासाठी लागणारा खर्च महापालिकेने करावा असा प्रस्ताव मोहोळ यांनी दिला होता. त्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली. 

वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग पौड फाटा येथून जात आहे. पौडफाटा येथून शिवणेपर्यंत स्वतंत्र मार्गिका करता येऊ शकते. याबाबत मोहोळ म्हणाले, "" कोथरुड गावठाण, डहाणूकर कॉलनी, नवसह्याद्री सोसायटी, हिंगणे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर, वारजे या भागातील नागरीकांना मेट्रो मार्गामुळे सार्वजनिक वाहतुकीचा सक्षम पर्याय उपलब्ध होईल.'' 

 मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी पुढील मार्गांचा डीपीआर करण्याची मागणी झालेले मार्ग 
* रामवाडी ते वाघोली 
* रामवाडी ते विमानतळ 
* पिंपरी ते निगडी 
* स्वारगेट ते कात्रज 
* सिंहगड रस्ता 
* वनाज ते चांदणी चौक 
 

Web Title: metro will run on paud road to varje- Shivane route